सुनील भंडारे पाटील
निमगाव म्हाळुंगी (ता शिरूर)चे सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांची नुकतीच सरपंच पदी निवड झाल्यामुळे मित्रपरिवारांच्या शुभेच्छा न स्विकारता सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केली पहिल्याच दिवशी हातात झाडू घेऊन ग्रामपंचायत कार्यालयाची स्वच्छता केली,
निमगाव म्हाळुंगी सरपंच सविता करपे यांनी नुकताच राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली होती त्यात संपूर्ण महाराष्ट्र भर सामाजिक कार्यात गेली 23 वर्षे अहोरात्र सामाजिक काम करणारे तसेच अनेक पुरस्कार प्राप्त असणारे आणि सद्या भारतीय जनता पार्टी मध्ये मन की बात पुणे जिल्हा संयोजक पदावर असणारे बापूसाहेब काळे यांची नुकतीच निमगाव म्हाळुंगी च्या सरपंच पदी बिनविरोध निवड आहे . दुसऱ्याच् दिवशी शनिवार असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाला सुट्टी होती परंतु गावच्या विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या सेवेसाठी दुसऱ्याच् दिवशी ग्रामपंचायत कार्यालय सुरु ठेवण्यात आले.
यावेळी संपूर्ण गावाने माझ्यावर आणि माझ्या कामावर विश्वास ठेऊन सुरवातीला मला ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध केले व नंतर पण सरपंच पण बिनविरोध केले त्याबद्दल गावाचे मी मनापासून आभार मानतो परंतु गावातील जनतेने मला जो विश्वास दाखवला त्या बद्दल कामं करणं गरजेचे आहे त्यामुळे कोणाच्याही मित्र परिवाराच्या शुभेच्छा न स्विकारता त्यांनी गावाची सेवा करण पसंद केले. असे नवनिर्वाचित सरपंच बापूसाहेब काळे यांनी सांगितले,
सदर वेळी गावातील काही नागरिकांचे पाण्याचे नळ चालू होते काही ठिकाणी पाईप निघाले होते ते स्वतः सरपंच यांनी त्यांच्या हाताने बसविले. सदर नळ बसवत असताना स्वतः ओले पण झाले परंतु गावची सेवा करत असताना त्यांनी सदर घटनेचा आनंद पण व्यक्त केला. तसेच नुकतेच निमगाव म्हाळुंगी च्या सरपंच पदी निवड झालेल्या सरपंच बापूसाहेब काळे आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पहिल्याच दिवशी हातात झाडू घेऊन ग्रामपंचायत कार्यालयाची स्वच्छता स्वच्छता केली, यावेळी ग्रामपंचायत कार्यालय हे कार्यालय नसून गावच्या ग्रामस्थांना सेवा देण्याचे हे एक लोकशाहीचे मंदिर आहे. गावचा ग्रामस्थ ज्यावेळी सदर लोकशाहीच्या मंदिरात येईल त्यावेळी त्या ग्रामस्थांना खूप प्रसन्न वाटले पाहिजे. ग्रामपंचायत कार्यालयाबद्दल आपुलकी वाटली पाहिजे.अशा भावना यावेळी सरपंच बापूसाहेब काळे यांनी व्यक्त केल्या.यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी लिपिक अपेक्षा टाकळकर, वसंत भागवत, प्रदीप करपे यांनी खूप चांगली साथ दिल्यामुळे मी हा उपक्रम करू शकलो. त्या बद्दल माझ्या कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानतो.सदर वेळी या उपक्रमाचे निमगाव म्हाळुंगी च्या ग्रामस्थांकडून सरपंच बापूसाहेब काळे यांनी केलेल्या कांमाच्या कौतुकाचा वर्षाव गावातून तसेच पंचक्रोशीतून होत असल्याचे आढळून आले.