सुनील भंडारे पाटील
हवेली तालुक्यातील १५ शाळा अनाधिकृत असल्याचे जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने बुधवारी जाहीर करण्यात आले. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसेच मुलांचा प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी सजग राहण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
हवेली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी नीलिमा म्ह्त्रे यांनी बुधवारी (दि. ८ नोव्हेंबर) पंधरा अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. काही शाळांनी नियमानुसार भौतिक सुविधा नसणे, शाळेच्या दर्शनी भागावर शाळा मान्यता क्रमांक, संलग्नता क्रमांक, युडायस क्रमांक प्रदर्शित केले नसल्याचेही शिक्षण विभागाला आढळून आले आहे. या सर्व शाळांनी मान्यता नसतानाही प्रवेश दिले आहेत. तसेच या शाळांनी आरटीआय कायदा व स्वयंअर्थसहाय्यीता कायदा उल्लंघन केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हवेली तालुक्यातील पुणे-नगर रोडवरील अनधिकृत शाळा :
यामध्ये 1)नारायणा ई-टेक्नो स्कूल वाघोली
2)न्यू विज्डम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा
3)स्मार्ट किड्स इंग्लिश स्कूल आव्हाळवाडी, वाघोली
4)विठ्ठल तुपे ई-लर्निंग स्कूल पिंपरी सांडस
5)रिव्हरस्टोन इंटरनॅशनल स्कूल , पेरणे फाटा
6)विब्ग्योर स्कूल, केसनंद