लोणी काळभोर गौरव कवडे
शिवशंभू स्मारक समिती कोलवडी साष्टे (ता हवेली) यांचे वतीने दरवर्षीप्रमाणे गड किल्ले स्पर्धेचे आयोजन केले जाते तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला समिती तर्फ़े किल्ले शिवनेरीचे दर्शन घडवण्यात येते, या वर्षी देखील अशा स्वरूपाचा उपक्रम समितीच्या वतीने राबविण्यात आला,
यावर्षी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण 116 जणांनी सहभाग नोंदविला,प्रथम बक्षीस वैष्णवी पवार व गणेश पवार,द्वितीय बक्षीस श्रीमंत काळभैरवनाथ प्रतिष्ठान भालसिंग वस्ती, तृतीय बक्षीस सुद्रशन उंद्रे व ज्ञानेश्वरी उंद्रे व चतुर्थ बक्षीस रोहन मोरे यांना मिळाले. सलग चौथ्या वर्षी शिवशंभू स्मारक समिती कोलवडी साष्टे यांनी यशस्वी आयोजन केले, शैक्षणिक जीवनामध्ये मुलांना शिक्षणाबरोबर छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा ज्वलंत इतिहास व त्याच्या बद्दलची संपूर्ण माहिती प्रत्यक्ष मुलांना अभ्यासायला मिळावी हा प्रमुख उद्देश असल्याचे शिवशंभू स्मारक समितीच्या वतीने सांगण्यात आले,