लोणी काळभोर गौरव कवडे
मास्टर्स गेम्स असोशियन महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज लोणी काळभोर (तालुका हवेली) चे क्रीडा विभागाचे प्रमुख क्रीडा शिक्षक भाऊसाहेब यशवंत महाडिक यांनी दोन पदक पटवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धा महाराष्ट्र राज्य विभागीय क्रीडा संकुल, मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक या ठिकाणी नुकत्याच संपन्न झाल्या या स्पर्धेत राज्यातील हजारो खेळाडू आर्मी दलाचे खेळाडू,पोलीस दलाचे खेळाडू,एअर फोर्स विभागाचे खेळाडू ,आयकर विभागाचे खेळाडू विविध शासकीय विभागाचे खेळाडू, शिक्षक ,राष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले होते.एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे क्रीडा विभागाचे प्रमुख क्रीडा शिक्षक भाऊसाहेब यशवंत महाडिक यांनी बांबू उडी प्रकारात द्वितीय क्रमांक व तिहेरी उडी प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला.असे दोन पदके पटकावून पुढील वर्षी फेब्रुवारी २०२४रोजी गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
मास्टर्स गेम्स असोशियन राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन मास्टर्स गेम्स असोशियन चे महाराष्ट्र राज्याचे सचिव बाळा चव्हाण, मास्टर्स गेम्स असोसिएशन पुणे विभागाचे जिल्हा सचिव महेंद्र बाजारे, मास्टर्स गेम्स असोशियन चे महाराष्ट्र राज्य सह सचिव धनंजय मदने ,आयकर विभागाचे अधिकारी आंतरराष्ट्रीय खेळाडू दत्तात्रय सरडे आयकर विभागाचे सहाय्यक अधिकारी चंद्रशेखर पाटील, एअरफोर्स दलाचे अधिकारी संतोष पवार, आयकर विभाग पुणे विभागाचे अधिकारी सुजित बडदे, अहमदनगर पोलीस विभागाचे पोलिस हवालदार अन्सर आली सय्यद यांनी केले .
यशस्वी खेळाडूचे अभिनंदन ओम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन अग्निहोत्री, ओम एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका इराणी मॅडम, ओम एज्युकेशन सोसायटीचे संचालक अविनाश सेलुकर, एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्या शमशाद कोतवाल, एंजल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या खुशबू सिंग, एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे मुख्य व्यवस्थापक खानसाहेब शेख व शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी केले.क्रीडा शिक्षक भाऊसाहेब महाडिक यांनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू तयार केले आहेत.