सुनील भंडारे पाटील
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले,
संपूर्ण राज्यभर गाजत असलेला मुद्दा मराठा आरक्षणासाठी शहर तसेच ग्रामीण भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने चालू आहेत, मराठ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी मीडिया देखील डोळ्यात तेल घालून सज्ज आहे, गेल्या अनेक दिवसांपासून चाललेल्या या आंदोलनाला यश मिळाल्याशिवाय आता माघार नाही, हिंदू योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असून राज्य सरकारला मराठा आरक्षणाविषयी निर्णय घ्यायला विलंब लागत आहे, त्यामुळे आंदोलने अजून तीव्र स्वरूपाचे होत असून, राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली,
धर्मपीठ, शक्तीपीठ, प्रेरणापीठ, बलिदान पीठ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथील धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी उपोषण आंदोलनाला गावामधील बहुसंख्य लोकांनी सहभाग घेतला आहे, मराठा आरक्षणाविषयी तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला,