लोणी काळभोर अनिकेत मुळीक
हवेली तालुक्यातील कदमवाक वस्ती गाव व लोणी काळभोर या दोन्ही गावांनी मिळून कदमवस्ती लोणी स्टेशन कॅण्डल मार्च,मोर्चाला सुरवात केली. त्यानंतर लोणी कॉर्नर ते गणपती मदिर चौक,ते मारुती मंदिर पासून खोकलाई देवी चौक उपोषण स्थळी मोर्चाची सांगता झाली. यावेळी मोर्चात हजारो समाज बांधव व महिला एकवटल्याचे पाहायला मिळाले.
मराठा आरक्षण त्वरित द्यावे मागणीसाठी तसेच मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाला पाठींबा देण्यासाठी लोणी काळभोर येथे आमरण उपोषण कर्ते (सूर्यकांत काळभोर) व सकल मराठा समाजातर्फे कँडल मार्च कढण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा ,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणार्या सरकार चा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच, मेणबत्त्या पेटवून उपोषण ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आल्या.यावेळी मोठया संख्येने समाज बंधू-भगिनी उपस्थित होते.