६६ वी वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कीताबाच्या लढत, फुलगाव, पुणे
आज संध्याकाळच्या सत्रात महाराष्ट्र केसरी माती विभागातील पहीलीच कुस्ती प्रकाश बनकर विरुध्द वेताळ शेळके - पै.संदीप भोंडवे
सुनिल भंडारे पाटील
६६ वी वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कीताबाच्या लढत, फुलगाव, पुणे येथे काल ५७ कीलो , ७४ कीलो व महाराष्ट्र केसरी गादी / माती विभागातील वजने झाली व आज सकाळी ८ वाजल्यापासून कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होत आहे.महाराष्ट्र केसरी विभागातील कुस्त्या फक्त संध्याकाळच्या सत्रात घेणार असल्याने सकाळच्या सत्रात महाराष्ट्र केसरी विभागातील कुस्त्या होणार नाहीत.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे संलग्न ४१ जिल्हा कुस्तीगीर संघ स्पर्धेत सहभागी झाल्याने अतिशय शानदार लढती प्रेशकांना पहावयास मिळणार आहेत . विशेष करुन महाराष्ट्र केसरी गादी विभागामध्ये गतसालचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे , महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील ,पै. हर्षद कोकाटे , पै.कालीचरण सोलनकर, पै.सुदर्शन कोतकर , पै.राजेंद्र सुळ, पै.निलेश लोखंडे , पै. अक्षय गरुड , पै.अक्षय कावरे या सोबत एकुण ३७ मल्ल सहभागी झाले असुन महाराष्ट्र केसरी माती विभागामध्ये पै.सिंकदर शेख , पै. वेताळ शेळके , पै. विशाल बनकर , पै. पृथ्वीराज मोहोळ , पै.सतीष मुंढे , पै.अनिकेत मांगडे , पै.समिर शेख यांच्यासह एकुण ३८ मल्ल सहभागी झाले आहेत.
आज संध्याकाळच्या सत्रात माती विभागामध्ये पहील्याच फेरीत पै.विशाल बनकर विरुध्द पै.वेताळ शेळके ही प्रेक्षणीय कुस्ती कुस्ती शौकीनांना पहावयास मिळणार असुन महाराष्ट्र केसरी गटामध्ये दुस-या फेरीच्या शानदार लढतीचा आनंद कुस्ती शौकीनांना पहावयास मिळणार आहे . ५७ व ७४ कीलो वजनगटातील कुस्त्या आज मंगळवारी सकाळीच सुरु झाल्या असुन त्या वजनगटामध्ये अतिशय नामांकीत मल्ल सहभागी झाले असल्याने त्या वजन गटामध्ये अतिशय प्रेक्षणीय कुस्त्या पहावयास मिळणार आहेत ..आज मंगळवारी सकाळी ६५ , ७९ व ९२ कीलो वजन गटातील वजने होणार असुन उद्या बुधवारी ६१ व ८६ कीलो व गुरवारी ७० व ९७ कीलो वजन गटातील वजने होऊन त्या कुस्त्यांना प्रारंभ होईल.