सुनील भंडारे पाटील
राज्यामध्ये अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला प्रश्न "मराठा आरक्षण" या मागणीसाठी खेड तालुक्यातील चिंबळी गावातील एका 22 वर्षीय मराठा तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काल घडली असून राज्यभरात घडणाऱ्या आत्महत्येला आता कोणाला जबाबदार धरायचं असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे,
गुणवत्तेनुसार आरक्षणामुळे मराठी तरुणांवर अन्याय होत असल्याचे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून दिसत आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मराठा समाजाकडून गेल्या अनेक वर्षांपासून लढा चालू आहे, परंतु राज्य शासनाकडून ठोस पाऊल उचलले न केल्याने अनेक जणांनी आत्महत्या केल्या, अन्याय सहन न झाल्याने आपला जीव संपवला, पुणे जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कायम सक्रिय सहभाग असणारा तारा हरपला,
अनेक दिवस लढा करून मराठी समाजाला आरक्षण मिळत नसल्याने, हा अन्याय सहन न झाल्याने चाकण जवळील खेड तालुक्यातील चिंबळी गावांमधील कु,सिद्धेश सत्यवान बर्गे या 22 वर्षीय तरुणाने काल गळफास लावून आत्महत्या केली, सरकारच्या कार्यपद्धतीला कंटाळून, तसेच मराठी समाजाला आरक्षण न मिळाल्याने आत्महत्या करीत असल्याचे सुसाईड नोट त्याच्या खिशामध्ये पोलिसांना सापडली, सिद्धेश ने हे टोकाचे पाऊल उचलल्याने समाजातील सर्व स्तरातील लोकांना दुःख झाले, मराठी समाजातील तरुणांनी आत्महत्या न करता शांततेच्या मार्गाने लढा देऊन आरक्षण मिळवावे असे टोकाचे पाऊल उचलू नये असे अनेकांनी मत व्यक्त केले, राज्यात होणाऱ्या या आत्महत्येना जबाबदार कोण असाही प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे,