निपाणी प्रतिनिधी सागर श्रीखंडे
हिंदू धर्मामध्ये दीपावलीचा सण हा सर्वात मोठा सण मानला जातो आणि हा सण आपल्या परिवारासोबत साजरा करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या परिवारासोबतच असते पण तरी याला काही निपाणी परिसरातील तरुण अपवाद आहेत,असे म्हटले तरी तरी चालेल. कारण हे तरुण स्वतःच्या आनंदापेक्षा गोमातेची सेवाला जास्त महत्त्व देवून गोसेवा हीच ईश्वर सेवा या याप्रमाणे मानले आहे त्यामुळेच हिंदू हेल्पलाइनच्या माध्यमातून मी हिंदू धर्म रक्षक अभियान परम पूज्य प्राणलिंग महास्वामीजींनी चालू केले होते या अभियानातील काही तरुणांनी आपली दिवाळी गोमतेला 10टन हून आधिक ऊस देवून साजरी केली.
निपाणी शहरांमधील प्रत्येक व्यापारी आपल्या आपल्या दुकानात लक्ष्मी पूजन आणी सजावट साठी मोठ्या प्रमाणात ऊसाचा वापर करत असतो आणी आपल्या परिवारासह मोठ्या उत्साहात लक्ष्मीपूजन करत असतो. यावेळी हिंदू हेल्प लाईन कडून समाधी मठ गोशाळे साठी ऊस द्यावे असे निपाणी व्यापारी वर्गाला आव्हान करण्यात आले होते याला प्रतिसाद देत 10 टन हून अधिल ऊस समाधी मठ गोशाळे ला निपाणी व्यापारी वर्गाकडून अर्पण करण्यात आला. यावेळी मी हिंदू धर्म रक्षक अभियान मधील तरुणांनी या केलेल्या उपक्रमाचे निपाणी परिसरातून कैतुक होत आहे. यावेळी वाहतूक करण्यासाठी गुरुकुल अकादमी चे सर्वेसर्वा चारुदत्त पावले यांनी विनामूल्य टॅक्टर ट्रॉली उपलब्ध करून दिली. यावेळी श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू .प्राणलिंग स्वामीजी म्हणाले मी हिंदू धर्म रक्षक या अभियान मध्ये सहभागी झालेले तरुणांनी गोमतेच्या सेवाला प्रथम प्रधान देवून ऊस गोळा केला हे खरंच अभिमानस्पंद गोष्ट आहे यावेळी पाऊस कमी झाला मुळे चाऱ्याची खूपच मोठी टनचाई होणार आहे पण असे तरुण जर समजहितासाठी काम करणारे असतील तर आपण कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो.
या तरुणाचा आदर्श इतर ही तरुणांनी घेवून समाजाहितासाठी कार्य करावे असे आवाहन प.पू.प्राणलिंग स्वामीजी यांनी केले.
यावेळी गोरक्षक आकाश स्वामी यांनी म्हणाले की वसुबारस दिवशी शेकडो तरुणांनी गोमातेचे स्टेटस,फोटो,व्हीडिओ ,वाटसॅप ,फेसबुक च्या माध्यमातून सोशल मिडीयावर ठेवत असताता शुभेच्छा देत असता पण गोरक्षन गोसंवर्धन करण्याची क्रुतिसाठी तरुण पुढे येत नाहीत हे हिंदूंची मोठी शोकांतिका आहे. गोमातेवर फक्त समजमाध्यमांवर प्रेम न दाखवाता गोसंवर्धन साठी प्रत्येक हिंदूंनी कार्य करायला हावे असे मत हिंदू धर्म रक्षक अभियान मधील प्रमुख आकाश स्वामी यांनी केले यावेळी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतेलेले अभिजीत सादळकर,राजेंद्र नार्वेकर,आप्पासाहेब माळगे,राजेंद्र सुतार ,अजित सादळकर,सागर श्रीखंडे सह मी हिंदू धर्म रक्षक अभियान मधील कार्यकर्ते उपस्तिथ होते यावेळी ऊस वाहतूक करण्यासाठी चारुदत्त पावले यांनी टॅक्टर ट्रॉली उपलब्ध करून दिली