पुणे नगर महामार्ग लगत पेरणे (तालुका हवेली) तसेच कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथे अवैधरित्या चालू असलेले टोरेंट गॅस कंपनीच्या पाईपलाईनचे काम पीपल्स रिपब्लिकन पार्टीने पुन्हा बंद केले, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांचा काम बंद करण्याचा आदेश असताना, टोरेंटचा मनमानी कारभार,
पुण्याकडून अहिल्या नगरच्या दिशेने पुणे नगर महामार्ग लगत चाललेल्या गॅस कंपनीच्या पाईपलाईन कामामध्ये परवानगी मधील अनेक नियम पायंदळी तुडवले जात आहेत, त्यात ऐतिहासिक ब्रिटिशकालीन विजयस्तंभ तसेच ऐतिहासिक कमानी दगडी बांधकाम मधील पूल याच्या अगदी जवळून काम चालले आहे, त्याचप्रमाणे वढू-तुळापूर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ अशी महत्त्वाची ठिकाणी या भागात आहेत, संपूर्ण राज्यातून देशातून विजयस्तंभ तसेच शंभूराजे समाधी स्थळी लोकांची गर्दी असते, त्याचप्रमाणे 2018 साली झालेल्या दंगलीमुळे हा भाग अतिशय संवेदनशील आहे,
महामार्गापासून 15 मीटर बाहेर खोदकाम करावे असे असताना रस्त्यालगत खोदकाम करून माती रस्त्यावर टाकली जात आहे, नुकतेच कोट्यावधी रुपये खर्चून केलेला रस्त्याचे नुकसान होत आहे, ओढे, नाले, नदी, लहान मोठे पूल याजवळ खोदकाम करू नये असे असताना कोरेगाव भीमा,पेरणे परिसरात जोरात काम चालू आहे,
या सर्व बाबींचा विचार करून पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्ष लताताई शिरसाठ यांनी गेल्या आठवड्यात संबंधित काम बंद करण्यासाठी आमरण उपोषण छेडले होते, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्यावतीने आम्ही काम बंद करत आहोत असे पत्र देऊन उपोषण आंदोलन थांबवले, असे असताना संबंधित कंपनीकडून पुन्हा काम चालू करण्यात आले, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पुन्हा कडक सूचना देऊन काम बंद केले,