प्रतिनिधी वैभव पवार
माहेर संस्थेच्या परिश्रम व्होकेशनल प्रशिक्षण प्रकल्पा अंतर्गत चालणाऱ्या विविध प्रशिक्षण वर्गाच्या प्रमाणे आज कोरेगाव भीमा (ता शिरूर) येथील ऐतिहासिक होळकर वाडा येथे चॉकोलेट मेकिंग प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणाचा 15 महिलांनी लाभ घेतला.
चॉकोलेट मेकिंग चे प्रशिक्षण प्रकल्प समन्व्यक तेजस्विनी पवार यांनी दिले, यात डार्क चॉकोलेट, मिल्की चॉकोलेट तसेच याला कसे आकर्षक पॅकिंग करता येते काय काय मटेरियल वापरले पाहिजे आकर्षक साचे डिझाईन वापरावी याबाबत सूक्ष्म प्रशिषण दिले. महिलांना स्वतःलाही बनविण्यास सांगितले, महिलांना यातून स्वतःचा व्यवसाय उभा करू शकता याबाबत माहिती देण्यात आली आणि हाच खरा महिला आत्मनिर्भर व महिला सक्ष्मीकरण करण्याचा संस्थेचा उद्देश असल्याचे प्रशिक्षक पवार मॅडम यांनी सांगितले.
यातील सहभागी महिलांनी नक्कीच आम्ही हि स्वतःचॉकलेट बनवू शकतो व आकर्षक पॅकिंग करून मार्केट मिळवू शकतो असा आत्मविश्वास व्यक्त केला.सदर प्रशिक्षण वर्ग माहेर संस्थेने आयोजित केल्या बाबत स्वामी समर्थ बचत गटाच्या स्वाती शिवले यांनी आभार व्यक्त केले.