अनिकेत मुळीक प्रतिनिधी
फुरसुंगी,चंदवाडी, (पुणे)येथील घटना पुण्यात गुन्हेगारी काही संपायचं नाव घेत नाही आहे. त्यात क्षृल्लक कारणावरुन होणाऱ्या वादातून हत्या केल्याच्या घटनां देखील वाढतं चाल्या आहेत. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे.
कारचा धक्का लागल्याच्या कारणाने झालेल्या वादातून तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अभिषेक संजय भोसले (वय 30, रा. शेवाळवाडी, मांजरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
कारचा धक्का लागला होता त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली. तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. फुरसुंगी ते चंदवाडी रोड रस्त्यावर मंगळवारी रात्री हा हत्येचा थरार पाहायला मिळाला. याप्रकरणी विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट, सचिन सकट (सर्व रा. चंदवाडी, फुरसुंगी) यांच्यासह आणखी 7 - 8 अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*क्षुल्लक कारणावरुन होत आहेत हत्या,,(पोलिस यंत्रणा अपयशी ठरतेय का?)*
सध्या पुण्यात क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. क्षुल्लक कारणावरुन भांडणं होतात, त्याच्या रागातून खून आणि हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याबरोबरच बलात्कार, सायबर क्राईम आणि लैंगिक छळांच्या घटनेत देखील वाढ होत आहे. कोयता गँग आणि चुहा गँग सक्रिय आहेत. त्यातील कोयता गँगने सध्या पुण्यात धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता पुण्यात एकापाठोपाठ एक क्षुल्लक कारणावरुन हत्या केल्याचं समोर येत आहे.