रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
रांजणगाव औद्योगीक वसाहतीमधील पेप्सीको इंडीया होल्डींग प्रा.लि. कंपनीतील स्टोअर रूममधील खिडकीचा कोयंडा तोडुन खिडकीतुन आत प्रवेश करुन ११,२०,९८०/- रु. किंमतीचे चिप्स बनविण्यासाठी लागणा-या मशीनचे साहित्य दि. १९ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान चोरीस गेले होते . सदर प्रकरणी कंपनीच्या वतीने . प्रविण अशोक बारी सध्या रा. शिरूर, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ रा. शिंदोणी, ता. जामनेर, जि. जळगाव यांनी फिर्याद दिली होती.
पोलीस निरीक्षक. महेश ढवाण यांनी सदरचा गुन्हा उघडीकस आणण्यासाठी स्वतंत्र तपास पथकाची नेमणुक करून त्यांना आरोपीचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. तपास पथकातील सहा. फौज, दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. विजय शिंदे, उमेश कुतवळ यांनी औद्योगीक वसाहतीमधील व कारेगाव परिसरातील ३० ते ४० ठिकाणावरील सी.सी.टि.व्हि. कॅमेरे चेक करून आरोपीनी गुन्हा केल्यानंतर जातांना वापरलेल्या स्कुटी मोटार सायकलचा सी.सी.टि.व्हि. कॅमे-यांचे मदतीने पाठपुरावा केला. तसेच गोपनिय माहितीच्या आधारे व तांत्रीक विश्लेषणाये आधारे तपास पथकाने (१) विजय पांडुरंग पाटिल वय ३६ वर्षे, रा. मोरगाव खुर्द, ता. रावेत, जि. जळगाव, (२) भुषण संतोष मिस्त्री वय २९ वर्षे, रा. निंभोरा, ता. जि. बु-हाणपुर, म.प्रदेश (३) मुकेश पिरमु धृवे वय २९ वरषे, रा. चंदनगाव, ता. जि. छिंदवाडा, म.प्रदेश तिन्ही सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सदर गुन्हयाची कबुली दिली आहे. सदर आरोपीना दि. २६ डिसेंबर रोजी गुन्हयामध्ये अटक करण्यात आलेली असुन मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी. शिरुर कोर्टाने आरोपीची ३ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. सदर आरोपीतांनी चोरलेले साहित्य हे आरोपी ४) सुनिल मांगीलाल महाजन वय ४८ वर्षे, रा. अमरदिप सोसा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे. यास विक्री केले असुन सदर आरोपीस दि. २८ डिसेंबर रोजी अटक करण्यात आलेली आहे. अटक आरोपीकडुन गुन्हयात चोरीस गेलेले ११,२०,९८०/- रु. किंमतीचे चिप्स बनविण्यासाठी लागणा-या मशीनचे साहित्य व गुन्हयात वापरलेली स्कुटी मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहा. पोलीस निरीक्षक अनिल मोरडे, सहा. फौज दत्तात्रय शिंदे, पो. कॉ. उमेश कुतवळ, विजय शिंदे, पो. हवा. विलास आंबेकर, माणिक काळकुटे यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे हे करीत आहेत.