सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालय ससून हॉस्पिटल येथे कार्यरत असणारा उपाधीक्षक कार्यालय,आरोग्य विभाग पुणे श्रेणी चार, चा उदवाहक याला 3000 रुपयांची लाच घेताना, दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी ससून हॉस्पिटलचे मुख्य दरवाजावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी रंगे हात पकडले, जालिंदर चंद्रकांत कुंभार वय 55 वर्षे, पद उदवाहक असे आरोपीचे नाव आहे,
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांनी ससून हॉस्पिटल पुणे येथे त्यांचे रक्कम रुपये 1,43,000/- एवढ्या रकमेचे वैद्यकीय बिल मंजुरीसाठी दाखल केले होते, सदर बिलाचे मंजुरीसाठी उपाधीक्षक कार्यालय आरोग्य, पुणे विभाग, येथे काम करणारा लोकसेवक कुंभार उदवाहक याच्याकडे दिले होते, त्याने बिलाची रक्कम कमी करण्यासाठी दोन टक्के रक्कम प्रमाणे 3000 रुपये लाच मागणी केल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांना प्राप्त झाली होती, पडताळणी दरम्यान वरील कारणासाठी लोकसेवक उद वाहक कुंभार याने 3000 रुपयांची लाच मागणी करत पंचां समक्ष स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांनी रंगेहात पकडले त्याच्यावर बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
सदरची कारवाई अमोल तांबे पोलीस अधीक्षक, शितल जानवे अप्पर पोलीस अधीक्षक, नितीन जाधव पोलीस उपाधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले, पोलीस हवालदार नवनाथ वाळके, पोलीस हवालदार सरिता वेताळ, पोलीस शिपाई प्रवीण तावरे, चालक पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत कदम, यांच्या पथकाने केली,