शिवाजीराव आढळराव पाटील, पोपटराव गावडे,निवृतीअण्णा गवारे सर्वपक्षीयांनी प्रा.शिंदेचा सेवागौरव करतांना दिल्या शुभेच्छा!
ज्ञानेश्वर मिडगुले -सणसवाडी
विद्याधाम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय कान्हूर मेसाई (ता शिरूर)चे प्राचार्य अनिल पोपटराव शिंदे यांचा सेवागौरव व सेवानिवृती सोहळा माजी आमदार पोपटरावजी गावडे यांचे अध्यक्षतेखाली हायस्कूल प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिवसेना उपनेते मा. खासदार आढळराव पाटील व जेष्ठ नेते निवृती अण्णा गवारे यांचे हस्ते पुणेरी पगडी,शाल पुष्पगुछ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. सकाळी सवाद्य मिरवणुक काढून कार्यक्रमा आधी विद्यालयाच्या ६५० छात्राना शिंदे परिवारातर्फे सुरुची भोजन व कार्यक्रमानंतर पुर्ण गावाला पालकांना व उपस्थीतांना भोजन देणेत आले.
शालेय विद्यार्थीनींनी ओवाळून व स्वागतगिताने मान्यवरांचे स्वागतानंतर सर्व मान्यवरांचे हस्ते शिवप्रतीमेला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले . यावेळी मा.आयुक्त कांतीलाल उमाप, ED चे डेप्युटी डायरेक्टर कुलदिप राजे,शिक्षण सहसंचालक हारुण आतारसो, मंत्रालय कक्ष अधिकारी अजय खर्डेसो, भिमाशंकर सा .का. उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील, माजी सभापती सुभाष उमाप, पीडीसीचे माजी अध्यक्ष निवृती अण्णा गवारे, मंत्रालय सचिव थोरात सो; विद्याधामचे अध्यक्ष गंगाधर पुंडे, सचिव सुदाम तळोले, माजी अध्यक्ष सदाशिव पुंडे,संकटमोचक सदस्य शहाजी दळवी, सदस्य बाबुराव दळवी, रोहिदास ढगे, तान्हाजी खर्डे, विजय तळोले, राजेंद्र ननवरे, प्रभाकर पुंडे, रामकृष्ण पुंडे, लहू तळोले , खजीनदार पुंडे, राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे, उद्योजक नाणेकर , सरपंच चंद्रभागा खर्डे, उपसरपंच योगेश पुंडे , सर्व आजी माजी ग्रां सदस्य ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थीत होते. चव्हाण सरांनी स्वागत केले. प्रास्ताविकात राऊत सरांनी प्राचार्य अनिल शिंदेच्या महतकार्याचा लेखा जोखा मांडला.
प्रा. शिंदे यांनी कार्यकालात कोटीभराची विद्यालयाची दात्यांच्या कामे करताना विद्यार्थ्यांना पुत्रवत मानून काम केल्याचे सांगितले. यावेळी जावई कुलदिप राजे, शिक्षण संचालक हारुण आतार, छात्रा संस्कृती नाणेकर, मा. आयुक्त कांतीलाल उमाप, प्रदिप वळसे पाटील,गंगाधर पुंडे, निवृती अण्णा गवारे, आढळराव पाटील व शेवटी अध्यक्ष पदावरून पोपटराव गावडे यांनी प्रा.शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. उत्कृष्ट समयोचित सुत्रसंचलन चव्हाण सर यांनी व आभार प्रदर्शन शिंदे संरानी मानले.निवृत शिक्षकाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात सेवा गौरव ग्रामस्थांनी केल्याचे हे अपवादात्मक उदाहरण आहे.