देहू आळंदी पद यात्रेचे आयोजन पर्यावरण प्रेमींना सहभागाचे आवाहन

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी
             पिंपरी चिंचवड शहर, देहू, आळंदी पंचक्रोशी परिसरातील विविध पर्यावरण प्रेमी सेवाभावी संस्था, व्यक्ती यांचे वतीने देहू ते आळंदी पर्यावरण जागृती व संकल्प पद यात्रेचे आयोजन रविवारी ( दि. ३१ ) करण्यात आले असल्याचे ग्रीन आर्मी पिंपरी चिंचवड शहर प्रशांत राऊळ, आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी सांगितले.
             पिंपरी चिंचवड शहर, आळंदी, देहू, चिखली, मोशी पंचक्रोशीतील विविध पर्यावरण प्रेमी व्यक्ती संस्थांनी या पदयात्रेत सहभागासाठी ग्रीन आर्मी पिंपरी चिंचवड प्रशांत राऊळ यांनी आवाहन केले आहे. या पद यात्रेचे आयोजन इंद्रायणी जल मित्र, महाराष्ट्र नवनिर्माण,आळंदी जनहित फाउंडेशन, रानजाई प्रकल्प देहू, चिखली मोशी पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन आदी सेवाभावी संस्था यांनी केले आहे. या पर्यावरण जनजागृतीचे उपक्रमात श्रीक्षेत्र आळंदी नगरपरिषद, देहू नगरपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था देखील यात  सहभागी होत आहे.
            दिवसे दिवस पर्यावरण समस्या गंभीर होत आहेत. वेळीच उपाय योजना जनजागृती साठी देहू ते आळंदी पर्यावरण जागृती व संकल्प पदयात्रा ३१ डिसेंबर २०२३ रोजी देहू येथून सकाळी आठ वाजता श्री संत तुकाराम महाराज मंदिर दर्शन करून देहूतील इंद्रायणी नदी घाटावर जनजागृती करून सुरु होईल. देहू, चिखली, मोशी डुडुळगाव मार्गे आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर दुपारी साडे बाराचे सुमारास समारोप होईल. त्यानंतर आळंदी मंदिर दर्शन आणि प्रसाद वाटप होईल. विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती यांचे वतीने पर्यावरण जागृती व संकल्प पदयात्रा आयोजित करण्यात आली सल्याचे आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद घुंडरे यांनी सांगितले.
         पदयात्रेत  देहु ते आळंदी या मार्गात संपूर्ण तसेच सोयीने थोड्या अंतरासाठी देखील सहभागी होता येणार आहे. यासाठी live Location देखील देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड, आळंदी, देहू पंचक्रोशीतील तसेच पुण्यातील सर्व पर्यावरण प्रेमी व्यक्ती , संस्था यांना सहभागासाठी आवाहन करण्यात आले आहे.  दिवसंदिवस पर्यावरण समस्या गंभीर होत आहेत. वादळ, पुर, अवकाळी पाऊस, भूस्खलन, ढगफुटी नजीकच्या काळात आपण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, नागपुर मधील ढगफुटी, इर्शाळवाडीतील भूस्खलन आणि मुंबई पुण्यातील हवेचे जीवघेणे प्रदुषण अनुभवले आहे. देहु व आळंदी ही महाराष्ट्राची दोन बलाढ्य शक्ती आणि ऊर्जा स्थाने आहेत. जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सर्व जगाला विचारांची आणि आचारांची संतवानी दिली. संतांच्या साक्षीने व आशीर्वादाने महाराष्ट्राच्या येणाऱ्या पिढीला वाचवण्यास तसेच एक स्वच्छ, सुंदर पर्यावरण देण्यासाठी देहू ते आळंदी असा पायी प्रवास करत पर्यावरण लढ्याचा संदेश या पद यात्रेतून देण्यात येणार असल्याचे प्रशांत राऊळ यांनी सांगितले.
           सध्या Climate Emergency म्हणजे वातावरणीय आपतकाल परिस्थिती सुरु आहे. पृथ्वीचे तापमान १.५℃ ने वाढण्यासाठी फक्त ५ वर्ष आणि २०६ दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर ही सध्याची परिस्थिती अजुन बिकट  होत जाणार आहे. नववर्षा साठी काही कृती संकल्प आराखडा देत आहे. जो सर्वाना लोकां पर्यंत पोहोचवायचा आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःहुन यासाठी योगदान देऊन साधे सरळ जीवनशैलीत बदल करून देखील आपण पर्यावरण संवर्धन कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
    पदयात्रा सुरुवात होण्याचे ठिकाणांसाठी https://maps.app.goo.gl/AnaDRB13EvU6iZwh9
पदयात्रा संपण्याचे ठिकाण https://maps.app.goo.gl/bEd2foVo48sqzEi57 लाईव्ह लोकेशन यावर मिळणार आहे. पद यात्रेत श्री संत तुकाराम दर्शन व पर्यावरण प्रतिज्ञा, पदयात्रेला सकाळी आठ वाजता देहूतून प्रारंभ, दहा वाजता चिखली मोई इंद्रायणी नदी पुल, आळंदी येथील इंद्रायणी नदी घाट येथे समाज प्रबोधन त्या नंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी दर्शन व प्रसाद वाटपाने सांगता होईल.
              पद यात्रेत अंदाजे १५ किलो मीटर चालता येईल असे कपडे परिधान करावेत. सोबत पाण्याची बाटली ( electrol किंवा ग्लुकोन डी ) तसेच कोरडा खाऊ ( केळी, चिक्की ) घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परतीच्या प्रवासासाठी आळंदी ते देहु प्रत्येक १५ मिनिटाला बस प्रवासाची सोय आहे. जास्तीत जास्त पर्यावरण प्रेमींनी या पद यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन प्रशांत राऊळ यांनी केले आहे.  
सहभागी पर्यावरण प्रेमी संस्था
देहु आळंदी पद यात्रा सहभागी होणाऱ्या संस्था मध्ये ग्रीन आर्मी, आळंदी जनहित फाऊंडेशन, श्री आळंदी धाम सेवा समिती, रानजाई प्रकल्प देहू, आळंदी नगरपरिषद, आर्ट ऑफ लिविंग, निसर्गप्रेमी इन्व्हॉर्नमेंट फाउंडेशन, बदलापूर, इंद्रायणी जलमित्र, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन, तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचलित पोलीस मित्र संघटना, इंद्रायणी स्पोर्ट फाउंडेशन पुणे, सदाबहार सोशल फाउंडेशन, चिंचवड, एक्सेलेंट सोल एनर्जी, बसव सेवा ट्रस्ट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विकासभाऊ साने सोशल फाउंडेशन, चिखली, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान आळंदी, इनोवेरा टेक्नॉलॉजीज पुणे, पवना जलमित्र आदींचा सहभाग होत असल्याचे श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!