लोणी काळभोर प्रतिनिधी सचिन सुंबे
पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक पोलिस यंत्रणेच्या नियोजनाअभावी प्रचंड वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत .. वाहतुक शाखेचे पोलीस सुध्दा या कोंडीने हतबल झाले असुन कोंडी सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत .
आज सहा वाजता वाहतुक कोंडीला सुरुवात झाली हडपसर ते लोणी हे अकरा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चार तास लागल्याचे नागरिकांनी सांगितले .यामध्ये विद्यार्थी व कामगार वर्ग व नागरिकांचे प्रंचड हाल झाले . पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाय योजनेची गरज असून वाहतूक पोलिसांनी योग्य ते नियोजन लावून याकडे गांभीर्याने पहावे असे अनेक नागरिकांनी सांगितले दिवसभर रस्त्यावर पावती पाडण्यास मग्न असलेले वाहतूक पोलीस आज मात्र तुरळक प्रमाणात दिसले . त्यामुळे नागरिकांनी वाहतूक पोलिसांविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशन ग्रामीण मधून शहर पोलीस विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर स्वतंत्र असे वाहतूक व्यवस्था शहर पोलिसांकडून नेमण्यात आली. मात्र ग्रामीणपेक्षा शहरी वाहतूक व्यवस्था आल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहतूक कोंडी सोडवण्यास शहर वाहतूक पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील नागरिक ग्रामीण वाहतूक पोलीसच बरे होते असे सांगत आहेत. शहर वाहतूक पोलिसांनी आता कडक उपाय योजनेची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.