अनिकेत मुळीक प्रतिनिधी क्राईम न्यूज
पुणे, मुंढवा लोणी काळभोर,हडपसर,मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला मुंढवा पोलिसांनी घतले ताब्यात. त्याच्याकडून चोरीच्या २ लाख ७५ हजार किंमतीच्या एकूण १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस अंमलदार दिनेश राणे यांना वाहन चोरीच्या गुन्हयात पकडलेले अल्पवयीन आरोपी दुचाकीवरून संशयितरित्या जात असतांना दिसला. त्याला आरोपी थांबवून विचारपूस केली असता, त्याने समाधानकार उत्तर दिले नाही. यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली असता सदर वाहने मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची तक्रार देण्यात आली होती. यानंतर अल्पवयीन मुलाकडे अधिक तपास केला असता हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ५ दुचाकी, मुंढवा आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ५ दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून २ लाख ७५ हजारांच्या १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक संगीता रोकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार दिनेश राणे, संतोष काळे, संतोष जगताप , राहुल मोरे ,स्वप्नील रासकर ,दिनेश भांदुर्गे ,सचिन पाटील यांच्या पथकाने केली आहे.