सुनील भंडारे पाटील
राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य हवेली तालुकास्तरीय कार्यकारणी केंद्रीय अध्यक्ष संस्थापक मधुसुदनजी कुलथे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाचे अध्यक्ष सुनिल भंडारे (पाटील) यांनी निवडी जाहीर केली जिल्हा संपर्क कार्यालय पेरणे फाटा (ता हवेली) येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
हवेली तालुकास्तरीय कार्यकारणी निवडी पुढील प्रमाणे हवेली तालुका अध्यक्षपदी पोपटराव शंकर मांजरे , उपाध्यक्षपदी अनिकेत अंकुश मूळीक, तर सचिवपदी शिंगू अगतराव खताळ, कार्याध्यक्षपदी सागर राजकुमार क्षिरसागर, संपर्क प्रमुखपदी अंबादास सुर्यकांन्त ढेंगे, प्रवक्तेपदी सतीश भगवान शिंगणे, संघटकपदी रेश्मा अर्जुन तांबे तर संदीप डोके सदस्य, प्रवीण चंद्रकांत शेंडगे सदस्य पदी यांची निवड झाली, उपस्थितांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
यावेळी राज्य मराठी पत्रकार परिषद, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजयराव लोखंडे, पुणे जिल्हा विभागिय अध्यक्ष नितिन करडे, पुणे जिल्हा विभागिय मुख्य संघटक संभाजी चौधरी यांच्यासह आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रतिभा संपन्न, निर्भीड, निष्पक्ष आणि व्यवस्था परिवर्तनाची आस असणाऱ्या पत्रकार बांधवांना संधी मिळत आहे. हे सुदृढ लोकशाहीसाठी अतिशय पोषक आहे. जिल्हाध्यक्ष सुनिल भंडारे (पाटील) यांनी बोलताना सांगितले तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजयराव लोखंडे यांनी संघटना वाढविणे व भक्कम करणे त्या विषयी मार्गदर्शन आपल्या प्रस्तावनेतून पत्रकार बांधवांना केले सुत्रसंचालन सतीष शिंगणे यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्ष सुनिल भंडारे यांनी मानले .
राज्य मराठी पत्रकार परिषदेने मला संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. या संधीचे सोने करून दाखवले अशी ग्वाही नवनिर्वाचीत तालुका अध्यक्ष पोपटराव मांजरे यांनी"भरारी न्युज" शी बोलताना सांगितले .