लोणी काळभोर प्रतिनिधी
लोणी काळभोर (तालुका हवेली) कदमवाक वस्ती पुणे हे विद्याचे माहेर घर मानले जाते.परराज्यातून विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येतात.मॉर्डन म्हणता म्हणताच विद्यार्थी व्यासणानाकडे वळत आहे.चांगले शिक्षण आरोग्यावर परिणाम करणारे तर ठरत नाही ना? पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती परिसरातील एका मोठ्या नामांकित शिक्षण संकुलाच्या परिसरात पुणे-सोलापूर हायवेच्या कडेला रस्त्यावरच असलेल्या विविध हॉटेल्स आणि कॅफेमध्ये विनापरवाना हुक्क्याची विक्री सर्रास सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
या ठिकाणी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी 'एन्जॉय' म्हणून हुक्क्याच्या धुराचा झुरका तोंडातून काढून हुक्क्याच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे या परिसरातील संस्कृती बिघडत चालल्याचे चित्र आहे. तरुणवर्गाबरोबरच स्थानिक परिसरातील अल्पवयीन मुले-मुलीसुद्धा या विळख्यात येत आहेत.लोणी स्टेशन परिसरातील बऱ्याच हॉटेलमध्ये विनापरवाना हुक्का विक्री सुरू आहे. ज्या ठिकाणी शिक्षण घेण्यास आलेले परराज्यातील विद्यार्थी हुक्का ओढत बसलेले दिसत असतात, यांच्याकडे पाहून स्थानिक युवकदेखील हुक्का ओढण्यास आकर्षित होत असल्याचे चित्र दिसून ये आहे.श्री रामांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत असे प्रकार उघड होत असल्याने आपल्या संस्कृतीवर घातक परिणाम होत आहे.संबंधित प्रशासनाने यावर त्वरित कठोर कारवाई करावी,अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे करणार आहे.- अभिजित रामदास बडदे, अध्यक्ष, तंटामुक्त समिती, कदमवाकवस्ती, हवेली, पुणे
'हर्बल'च्या ( वनऔषधींच्या नावाखाली हुक्का पार्लरचा सुळसुळाट झाला असून, यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. या अनधिकृत व्यवसायावर कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
अनेक हॉटेलमध्ये केवळ हर्बल हुक्का असल्याचे सांगून त्याऐवजी टोबॅकोची विक्री करतात. या ठिकाणी हुक्क्याची सिसा, हब्बल-बब्बल, हुक्कापेन आदी नावाने विक्री होत आहे. तसेच परिसरातील साध्या टपरीवरही हुक्का व त्याचे साहित्य उपलब्ध होत असून, त्याबरोबर गांजा, एमडी, दारू, गुटखा अशा प्रकारचे हानीकारक अमली पदार्थदेखील विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होत आहेत.
तसेच व्यसनाच्या आहारी गेलेले विद्यार्थी रोडवरच अश्लील हावभाव करत असल्याने स्थानिक परिसरातील महिला, मुली यांची कुचंबणा होत आहे. शिक्षण संकुलातील बरेच विद्यार्थी संकुलाबाहेर खासगी फ्लॅट घेऊन राहत असतात.परिसरातील अमली पदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक या विद्यार्थ्यांबरोबर मैत्री करून त्यांच्या मार्फत व्यवसाय करत असल्याचे भयानक सत्य काही नागरिकांच्या समोर आले आहे. या सर्व अनधिकृत व्यवसायांवर अमली पदार्थ विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.