सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वास्तू विजय स्तंभ तसेच ब्रिटिश कालीन कमानी दगडी बांधकामातील पूल या जवळून चाललेले टोरेंट कंपनीच्या पाईपलाईनचे काम गेल्या काही महिन्यांपासून चालू असून खोदकाम करणारी इंजेक्शन ड्रिल मशीन आज हटवण्यात आली,
संबंधित पाईपलाईनच्या कामाला परिसरातून तीव्र स्वरूपाचा विरोध होत असून त्या संदर्भात जिल्हाधिकारी पुणे, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांना अनेकांनी तक्रारी देखील दिल्या आहेत, परंतु तरी देखील टोरेंट कंपनीने आपले काम बंद ठेवले नाही, यामागील गुपित काय याचा उलगडा आता नागरिकांना झाला आहे, 1 जानेवारी 2024 रोजी ऐतिहासिक विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो भीमसैनिक येणार असल्याकारणाने घाबरून चतुर टोरेंट कंपनीने तातडीने सर्व यंत्रसामुग्री या ठिकाणाहून हलवली,
टोरेंट कंपनीच्या गॅस लाईन पासून ऐतिहासिक विजयस्तंभ, ब्रिटिश कालीन दगडी कमानी पूल, तसेच शेजारी मोठी रहदारी असणारी विजयस्तंभ नगर झोपडपट्टी याला संबंधित पाईपलाईन पासून धोका असल्याचे जनतेचे मत वेळोवेळी भरारी न्यूज ने मांडले आहे,
आज सणसवाडी येथे टोरेंट गॅस कंपनीची पाईपलाईन फुटून दुपारी स्फोटाचा भयानक आवाज झाला, मोठा आगीचा लोळ चालला होता, भर वस्तीत पाईपलाईन फुटल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले, अशी घटना जर या ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी घडली तर घटनेचे गांभीर्य शासनाच्या लक्षात यायला हवे, अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे,