सुनील भंडारे पाटील
सणसवाडी (तालुका शिरूर) येथे भर वस्तीत रस्त्यालगत जमिनीखालील गॅस पाईपलाईनला लागलेल्या प्रचंड आगीमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून आगीची धग सुमारे दोनशे फूट अंतरापर्यंत लागत होती, त्यामुळे परिसरात जवळ जाने मुश्किल झाले आहे,
अलीकडच्या काळात शिरूर तसेच हवेलीच्या बऱ्याचशा भागांमध्ये गॅस पाईपलाईन व्यावसायिक व ठेकेदार यांच्या मनमानी कारभाराने गॅस वाहतूक पाईपलाईनचे जाळे झाले आहे, गॅस पाईपलाईन फुटून पुणे तसेच कोंढवा या भागात लागलेल्या आगीने झालेले नुकसान अशा घटना ताज्या असताना सणसवाडी मधील भुजबळ वस्ती या भर लोक वस्तीमध्ये आज लागलेल्या आगीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे,
पुणे नगर महामार्गावर पुणे शहराकडून अहिल्या नगर कडे धोकादायक असे टोरेंट कंपनीच्या गॅस पाईपलाईनचे काम युद्ध पातळीवर चालू आहे, या संदर्भात देखील अनेक तक्रारी झाले आहेत परंतु संबंधित ठेकेदारांकडून रगील पणाने हे काम चालू आहे, या भागात देखील अनेक गावे तसेच लोकवस्ती यामधून हे काम चालू असून भविष्यात धोका असल्याचे अनेकांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे, तसेच भरारी न्यूजने अनेक बातम्यांच्या मालिकेतून ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिली आहे, आता फक्त शासन मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहे काय? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे,
सणसवाडीच्या सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांनी सांगितले की, टोरेंट गॅस पाईपलाईन पासून लोक वस्तीला खूप धोका आहे, आम्ही अनेकदा ही पाईपलाईन बंद करण्याविषयी सांगितले परंतु टोरेंट गॅस कंपनीकडून लक्ष दिले जात नाही आज झालेल्या घटनेत आगीची तीव्रता खूप जास्त होती, भुजबळ वस्तीवरील सर्व लोकांच्या तक्रारी आहेत, टोरेंट कंपनीने तातडीने ही पाईपलाईन बंद करावी अशी मागणी सर्वांमध्ये होत आहे,