वाघोली प्रतिनिधी
केसनंद (ता.हवेली) येथील जोगेश्वरी महाविद्यालयात वाघोली बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा नुकतीच केसनंद, वाडेबोल्हाई,वाघोली या तीन केंद्रातील केंद्र स्तरावर प्रथम आलेल्या सर्व स्पर्धकांनी व संघाने सहभाग घेऊन बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या.
खो - खो, कबड्डी,भजन,नृत्य, लेझीम व वैयक्तिक क्रीडा प्रकार, वकृत्व स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धा संपन्न झाल्या. केसनंद केंद्रातील स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. विजय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्र. हि मिळविले. शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी नेत्या अलका सोनवणे जास्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अतुल हरगुडे, प्रमोद हरगुडे गणेश हरगुडे मुख्याध्यापिका देशमुख मॅडम, केंद्रप्रमुख अंकुश बडे गोविंद केंद्रे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.