खेड प्रतिनिधी
राजगुरूनगर (खेड) येथे नुकत्याच झालेल्या राज्य मराठी पत्रकार परिषदच्या बैठकीत खेड तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली तत्पूर्वी पुणे वाघोली येथे राज्य मराठी पत्रकार परिषद च्या झालेल्या वार्षिक आढावा बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष मधुसूदनजी कुलथे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजयराव लोखंडे, पुणे विभागीय अध्यक्ष नितीन करडे, पुणे जिल्हाध्यक्ष सुनील भंडारे पाटील व इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खेड तालुक्या मधील गौतम लोखंडें यांची जिल्हा उपाध्यक्ष तर खेड तालुका अध्यक्ष म्हणून डॉ देवेंद्र ओव्हाळ आणि उपाध्यक्ष म्हणून सुनील शांताराम वाघचौरे यांची निवड करण्यात आली तदनंतर खेड येथे गौतम लोखंडें आणि डॉ देवेंद्र ओव्हाळ यांच्या उपस्थितीत खालील मान्यवरांची सर्वानुमते निवड करण्यात आली
डॉ. देवेंद्र ओव्हाळ (अध्यक्ष)
सुनील शांताराम वाघचौरे (उपाध्यक्ष)
अशोक कडलक (कार्याध्यक्ष)
गणेश वाळुंज (संपर्क प्रमुख)
मनोहर गोरगल्ले (सल्लागार)
दीपक बोंबले (सचिव)
राहुल सोनवणे (सह - सचिव)
विकास शंकर शिंदे (खजिनदार)
गणेश सावंत ((उप - खजिनदार)
सुधाकर अभंग (सदस्य)
सचिन साबळे (सदस्य)
संजय दाते (सदस्य)
संजय साळुंखे (सदस्य)
संतोष काळुराम फडके (सदस्य)
वेदांत ओव्हाळ (सदस्य)
संतोष शंकरराव रायकर (सदस्य)
सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत खेड तालुक्यामध्ये ही संघटना आणि हे संघटनेचे पदाधिकारी सकारात्मक पत्रकारिता जपतील आणि निर्धास्तपणे काम करतील जनसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवतील असा विश्वास खेड तालुका अध्यक्ष देवेंद्र ओव्हाळ यांनी दर्शविला