लोणी काळभोर प्रतिनिधी
जुन्या पेन्शन नंतर आता संरपच आणि ग्रामपंच्यायत कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.या मध्ये ग्रामपंचायत लोणी काळभोर ने देशील आपला सहभाग नोंदविला आहे.विविध मागण्यांसाठी पुढील ३ दिवस ग्रामपंच्यातींचा कारभार ठप्प राहणार आहे.अशी जाहीर माहिती गावातील नागरिकांना दिली आहे.
राज्यातील सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी आता त्यांच्या विविध मागण्यासाठी संपाचे हत्यार उपसले आहे. पुढील तीन दिवस ग्रामपंचायतीचे कामबंद घेवण्यात येणार असल्याने गावगाडा ठप्प होणार आहे. हे कर्मचारी पंचायत समित्यांसमोर आंदोलन करणार असून २७ हजार ग्रामपंचायत आणि ६० हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहे.
*कशा साठी संप:-*
ग्रामपंचायत सदस्य भत्ता, सरपंच उपसरपंच थकीत मानधन अदा करावीत, मानधनात भरीव वाढ व्हावी, मानधनाची शंभर टक्के रक्कम शासनानेच द्यावी, विनाकारण कामावरून कमी केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना परत कामावर घेण्यात यावे, नगरपालिका कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही दर्जा देऊन वेतन देण्यात यावे, यासह संगणक परिचलकांच्या मागण्यासाठी हे तीन दिवस आंदोलन पुकारण्यात आले आहे.या संपात अखिल भारतीय सरपंच परिषद, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कामगार सेना या बरोबरच ग्रामपंचयातींशी संबंधित सर्व संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलना नंतर देखील मागण्या मान्य झाल्या नाही तर तिव्र लढा उभा करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.