सुनील भंडारे पाटील
भारतीय जनता पार्टी हवेली तालुका तसेच शिरूर तालुक्यामध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नुकतीच नेमणूक करण्यात आली, त्यामध्ये शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातून इच्छुक असणाऱ्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याचा हवेली तालुक्या मधील शुभेच्छा बॅनर मध्ये फोटो नसल्याने, लोकांमध्ये चर्चेला उधान आले आहे,
भारतीय जनता पार्टी पक्षाची, महाराष्ट्र राज्य,पुणे जिल्हा तसेच तालुका निहाय कार्यकारण्या तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी नियुक्त्या नुकत्याच झाले असून, या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिरूर तसेच हवेली तालुक्यामध्ये होर्डिंगच्या त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहे, बनवलेल्या या शुभेच्छा काही बॅनर मध्ये मात्र आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी पक्षाने जाहीर केलेल्या संभाव्य उमेदवाराचा फोटो हवेली तालुका मध्ये का दिसत नाही? अशी चर्चा सध्या जनतेमध्ये रंगू लागली आहे, तर शिरूर तालुक्यामध्ये मात्र बॅनर वर फोटो दिसत आहे, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले असून चर्चेला उधाण आले आहे,
वाघोली येथे भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांत पाटील यांच्या झालेल्या सभे अगोदर पद वाटप करून पदाधिकाऱ्यांना होर्डिंग तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या,त्यामध्ये हा फरक लोकांच्या लक्षात आला, त्यामुळे भाजपा पक्षामधील गटबाजी उघड झाली असून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन चर्चेला मात्र उधान आले आहे,