क्राईम रिपोर्टर प्रतिनिधी अनिकेत मुळीक
पुणे मार्केट यार्ड परिसरात फटाके फोडण्यावरुन एका तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फहीम खान व त्याच्या इतर २ साथीदारांवर पुणे पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS ) यांनी आतापर्यंत 98 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे.
याबाबत कुमार राम कांबळे (वय-२० रा. आंबेडकर नगर, मार्केटयार्ड) याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार फहीम फिरोज खान (वय-21), शाहरुख सलीम खान (वय-21 सर्व रा. आंबेडकर नगर) यांच्यावर आयपीसी 307, 323, 504, 34 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली असून आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत. तर त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. हा प्रकार १२ नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास मार्केटयार्ड येथील गल्ली नंबर 11 येथे घडला होता.
मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड पोलीस निरीक्षक गुन्हे स्वप्नाली शिंदे सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अंमलदार अमरनाथ लोणकर, चव्हाण यांच्या पथकाने केली.पुढील तपास वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे करीत आहेत.