क्राईम रिपोर्टर प्रतिनिधी अनिकेत मुळीक
लोणी काळभोर (तालुका हवेली) येथील पोलीस ठाणे हद्दीतील ३ सराईत गुन्हेगारांविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आले असून. एक जण फरार आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार:- टोळी प्रमुख वैभव ऊर्फ गोट्या राजाराम तरंगे वय २० , रा. दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली , सागर अरुण सिन्हा (रा. उरुळी कांचन ता. हवेली ) यांना अटक करण्यात आली असून यश लोणारी ( रा. तुपेवस्ती,) हा फरारी आहे.
वैभव तरंगे हा लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने गुन्हेगारी टोळी तयार केली असून. सदर टोळीवर मागील १० वर्षात खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करताना दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दुखापत करुन घरात अतिक्रमण करणे, बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्या मार्फत अप्पर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रकरणाची छाननी करुन त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे, त्या अंतर्गत कारवाई करण्यात आली,