वाघोलीतील सोसायटी बिल्डिंगच्या आवारात वाईन शॉपला महिलांचा विरोध सोसायटी धारकांचे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
         वाघोली (ता हवेली) येथे सोसायटीच्या आवारात येणाऱ्या वाईन शॉपला सोसायटीतील रहिवासी महिलांनी तीव्र विरोध दर्शविला आहे , परिसरात वाईन शॉप आल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा महिलांनी दिला आहे.
वाईन शॉप येणाऱ्या सोसायटीमध्ये एक शाळा तर  सोसायटीच्या समोर दुसरी शाळा असल्याने महिलांकडून विरोध वाढला आहे,वाईन शॉप सुरू झाल्यास विद्यार्थ्यांवर परिणाम होणार असल्याचे देखील महिलांनी सांगितले 
तर बिल्डींगच्या आवारात वाईन शॉपला परवानगी देऊन नये असे लेखी निवेदन वाघोलीतील हॅप्पी होम्स सोसायटी धारकांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.
           सोसायटीमधील काही दुकान मालकांनी सोसायटीला विश्वासात न घेता आणि कोणताही पत्रव्यवहार न करता अचानक पणे काही दुकानामध्ये वाईन शॉप चे दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोसायटीच्या बिल्डिंग मध्ये स्ट्रायकिंग माईंड्स स्कूल आणि बिल्डिंगच्या समोर लिटील विंग्स स्कूल या दोन लहान मुलांच्या शाळा आहेत व २०० मीटरवरती दहावी पर्यंतचे रेमंड स्कूल आणि स्पोर्टस अकॅडेमि आहेत. तसेच १०० मीटर अंतरावरती जीवनतारा हॉस्पिटल व लाईफ केयर हॉस्पिटल आहेत आणि ५० मीटर अंतरावर श्री खंडोबा मंदिर आहे. हैप्पी होम्स सोसायटीच्या बाजूला कोझी होम्स सोसायटी, जुबिलेशन सोसायटी, ग्रँड व्हेंटीला सोसायटी आहेत. तसेच या सर्व सोसायटींच्या लहान मुलांच्या शाळेच्या बस थांबण्याची जागा त्या दुकानांसमोर आहे. तसेच सोसायटीतील महिला व लहान मुलांना बाहेर येणे जाणे अवघड होणार आहे. वाईन शॉपचा या सर्व गोष्टीवर परिणाम होऊ शकतो.  सोसायटीच्या आवारात वाईन शॉपचे दुकान सुरु होऊ नये यासाठी महिलांनी एकत्र येत विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. वाईन शॉप होऊ नये असे विरोधातील सह्यांचे पत्रक जोडत सोसायटीच्या बिल्डिंगच्या जागेत किंवा आवारात कुठेही वाईन शॉप होऊ देऊ नये असे लेखी निवेदन देण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!