सुनील भंडारे पाटील
अहिल्यानगर महामार्गाचे ४ पदरीचे ६ पदरीकरण्याचे काम मा. अक्षीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ पुणे यांनी मे. डी. जी. बेल्हेकर अँन्ड कंपनी, अशोक नगर पुणे ४११००७ यांना आदेश क्र.टी.सी./ अँन्युटी पीएन १६३/५५६३ दि. २७/८/२०१९ अन्वये दिले आहे. मे. बेल्हेकर ठेकेदार यांना आदेश देवून ४ वर्ष होवून गेली तरी त्यांचा कडून तुळापूर फाटा चौक व लोणीकंद (ता हवेली) गावातील बायपास चौक या दोन्ही चौकांचे विस्तारीकरण आणि लोणीकंद हद्दीतील ४ पदरीचे ६ पदरी विस्तारीकरण ही तीन कामे पुर्ण झालेली नाहीत,
त्यामुळे थेऊर चौकीतील व आळंदी फाटा चौकातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असलेल्या महामार्गावरील दोन्ही लेन मधील अतिक्रमण तसेच इतर अडथळे शासनाने तातडीने दूर करावे तसेच दररोजच्या होणाऱ्या वाहतुक कोंडीस ठेकेदार मे.बेल्हेकर व सार्वजनिक बांधकाम खाते हेच सर्वस्वी जबाबदार आहेत.म्हणून महाराष्ट्र शासनातील बांधकाम खात्याचे राजपत्रित वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक आमदार व खासदार या लोकप्रतिनिधींचे सदर बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी व अतिक्रमण इतर अडथळे शासनाने तातडीने दूर करावेत,या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते भारतीय किसान संघ व प्रबोधन केंद्राचे अध्यक्ष संस्थापक उत्तम भोंडवे यांनी मा .जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदनाद्वारे तक्रार दिली होती त्याची संबंधित प्रशासनाने दखल न घेतल्याने त्यांनी ६ डिसेंबरला सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली लोणीकंद ग्रामस्थांनी थेऊर चौकात एक दिवशीय लक्षणीय उपोषण आंदोलन करण्यात आले,
प्रशासनाने दखल न घेतल्याने उत्तम भोंडवे यांनी लाक्षणिय उपोषण आंदोलन केले आंदोलना वेळी असंख ग्रामस्थ उपस्थित होते त्यामध्ये अनेक आंदोलकांनी आपले मत व्यक्त केले संबंधित वाहतुक कोंडीचा नागरीकांना अतिशय त्रास होत असून तातडीच्या वाहतूक तसेच रुग्णसेवेमध्ये तर खूप अडचणी येत आहेत, शिवाय वाहतुकीच्या कोंडीमुळे इंधन देखील खूप वाया जात आहे एकंदरीत खूप मोठी नुकसानीची ही वाहतूक कोंडी असून रस्ता वाहतुकीमध्ये येणारे अडथळे दूर करण्याची खूप गरज आहे, दोन्ही लेन मधील अतिक्रमण तसेच इतर अडथळे शासनाने तातडीने दूर करावेत, या मागणीसाठी आज लोणीकंद येथे सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवशीय लक्षणीय उपोषण आंदोलन करण्यात आले,
या आंदोलनाची तातडीने दखल घेत शासनाच्या वतीने पावले उचलण्यात आली, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे सहाय्यक अभियंता कदम यांनी आंदोलन स्थळी आंदोलकांची भेट घेऊन ठराविक मुद्द्यावर चर्चा केली तर थेऊर फाटा चौकातील लाईटचा पोल हटवण्याचे महावितरण च्या बाबर व जाधव यांना सूचना केली ते यावेळी उपस्थित होते तसेच लोणीकंद हद्दीतील स्थानिकांना अतिक्रमण बाबत रीतसर नोटीस देणार सात दिवसाची मुदत देऊन सात दिवसांनी काही आक्षेप नोंदविला तर आक्षेप सोडून बाकीच्यांवर आम्ही कारवाई सुरू करणार आहेत ज्याचा आक्षेप आहे त त्याची कागदोपत्री प्रोसिजर करू तसेच मंदिरा याविषयी व रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन काढण्यासाठी संबंधितांना व ग्रामपंचायतला नोटीस देणार नंतर सात दिवसांनी एम एस सीबी व पीडब्ल्यूडी संयुक्त कारवाई पुढील सात दिवसात करण्याचे आश्वासन कदम यांनी यावेळी आंदोलकांना दिले
कृषी उत्पन बाजार समितीचे उपसभापती रविंद्र कंद यांनी बोलतांना सांगितले की सहाय्यक अभियंता कदम यांनी आठ दिवसात पुढील कारवाई करून अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन दिले असून उत्तम अण्णांनी उपोषणाला स्थगिती दिल्याचे जाहीर केले व अण्णांनी ज्युस घेऊन लाक्षणीय उपोषण सोडले
यावेळी किसान संघ व व प्रबोधन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव भोंडवे, माजी उपसभापती नारायणराव कंद, माजी उपसरपंच श्रीमंत झुरुंगे, ज्ञानेश्वर मारुती झुरुंगे माजी चेअरमन सोमेश्वर पतसंस्था बाळासाहेब मोरे, गुलाबनाना कंद,रघुनाथ कंद, गुलाबराव शिंदे,
माजी उपसरपंच संजय कंद,सदाशिव बाबुराव झुरुंगे, रामदास कंद,ज्ञानेश्वर शिवले,रवींद्र बाबुराव कंद, गजानन कंद, चंद्रकांत मगर, ज्ञानेश्वर कंद,शिरूर दिंडीचे माजी अध्यक्ष हनुमंत शिवले,संपतराव कंद,माजी सरपंच माऊली शिवले, माजी आदर्श सरपंच श्रीकांत कंद,विद्यमान उपसरपंच राहूल शिंदे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रविंद्र कंद, साईनाथ वाळके, भाजपा मोर्चा आघाडी संतोष झुरूंगे, साईनाथ वाळके, माऊली ठोंबरे, विक्रम पाटील, सुधीर कंद, सागर गायकवाड,माऊली ठोंबरे ,शांताराम तापकीर,हरिभाऊ शिवले, माऊली कंद, सोपानराव कंद, परशुराम कापरे, दत्तात्रय जगताप,विकास शिंदे,जयेश कंद, समीर झुरुंगे,पुणे जिल्हा संघटक ठाकरे गट श्रद्धा कदम,अलका सोनवणे, उर्मिला भुजबळ, समन्वयक प्रणाली तांबे, राजेंद्र कंद, उत्तम झुरुंगे,काळूराम ठोंबरे, रवींद्र जगताप,गोविंदराव जगताप, ग्रामविकास अधिकारी बोराणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,