सुनील भंडारे पाटील
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी आळंदी देवाची येथील कार्तिकी एकादशीनिमित्त कोरेगाव भीमा तसेच पेरणे फाटा पुणे-नगर मार्गावरून अहिल्या नगर कडून आळंदीकडे असंख्य पालख्यांचे आज प्रस्थान झाले,
हरिनामाच्या , टाळ, मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत वारकरी पायी चालत शेकडो वारकरी आळंदीच्या दिशेने रवाना झाले, शनिवार ता 9 रोजी आळंदी येथे कार्तिकी एकादशीचा सोहळा साजरा होत आहे, त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून चहु बाजूने पालख्या व दिंड्या घेऊन वारकरी ज्ञानोबारायाच्या भेटीला मार्गस्थ होत आहेत, जगाच्या पाठीवर वारकऱ्यांसारखे पुण्याचे काम कोणाचे नाही, या वारकरी सांप्रदायाचा पाठपुरावा अहिल्यानगर भागात जास्त केला जात असून, पुणे नगर महामार्गावरून 10 मिनिटाच्या अंतरावर पालख्या आळंदीच्या दिशेने प्रस्थान करताना दिसत आहेत,
माऊलींचा रथ, त्याचप्रमाणे वारकऱ्यांच्या हातामध्ये भगवा ध्वज, ओठांवर हरिनामाचा जप, टाळ मृदुंगाचा गजर, यामुळे संपूर्ण वातावरण भगवेमय झाल्यासारखे दिसत आहे, लहान, थोर,अबाल,वृद्ध, महिला यांचा सहभाग आहे, कार्तिकी एकादशीला अजून दोन बाकी आहेत, पालखी व दिंड्या मार्गस्थ होणाऱ्या मार्गावर ठीक ठिकाणच्या गावच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था तसेच भोजनाची व्यवस्था ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे, माऊलींच्या पालखी व दिंडी सोहळ्यात वारकऱ्यांना काहीच कमी पडत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे,