कारेगाव मधील बोगस डॉक्टरला ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Bharari News
0
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे 
           कारेगाव ता. शिरुर  येथे सन २०१८  ते सन २०२१  या कालावधीत मेहमुद फारुख शेख रा. पिर बु-हाणपुर, ता.जि. नांदेड हा डॉ. महेश पाटील असे खोटे नाव वापरुन श्री. मोरया हॉस्पिटल, या नावाने हॉस्पिटल सुरु केले होते. आरोपी मेहमुद फारुख शेख हा इयत्ता १२  अनुत्तीर्ण असतांना तसेच त्याचे वैद्यकिय क्षेत्रातील कोणत्याही प्रकारचे शिक्षण झालेले नसतांना व त्याच्याकडे वैदयकिय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसतांना देखील त्याने एमबीबीएस  पदवीचे बनावट सर्टिफिकिट तयार करुन त्या आधारे डॉ. महेश पाटील या बनावट नावाने श्री मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आयसीयु" हे चालवुन सदर हॉस्पिटलमध्ये पेशंटवरती औषोधोपचार केले होते. कोवीड काळामध्ये त्याने औषोधोपचार केलेल्या रुग्णांपैकी एकुण ७  रुग्ण कोवीड-१९ आजारामध्ये मयत झालेल्या होते. 
          या बाबत  डॉ. शितलकुमार राम पाडवी, वय 45 वर्षे, व्यवसाय डॉक्टर (एमबीबीएस डीजीओ ) रा. गार्डन व्हिला, नवापुर, ता. नवापुर, जि. नंदुरबार यांचे फिर्यादीवरुन रांजणगाव एमआयडीसी  पोलीस स्टेशनला बोगस डॉक्टर मेहमुद फारुख शेख याच्याविरुध्द गुन्हा रजि. नं. १६२/२०२१ भा.द.वि. कलम ४२०, ४६७ , ४६८, ४७१, महाराष्ट्र वैद्यकिय अधिनियम १९६१ चे कलम ३३(२) अन्वये दि. २२/४/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक
सुरेशकुमार राऊत,  यांनी तसेच पोलीस . हवालदार . विलास आंबेकर यांनी करून आरोपीविरुध्द प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. शिरुर कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर केसची सुनावणी चालु असतांना गुन्हयातील साक्षीदार यांना पोलीस निरीक्षक श्री. महेश ढवाण यांनी साक्षीबाबत ब्रिफिंग केल्याने सर्व साक्षीदार यांचे साक्षी पुराव्याचे आधारे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी 
.पी.एस. कोनकांबळे . शिरुर यांनी दि. २५/१२/२०२३ रोजी आरोपी मेहमुद फारुख शेख रा. पिर बु-हाणपुर, ता. जि. नांदेड यास ३ वर्षे सश्रम कारावास व १८,००० रु. दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
         सदर केसमध्ये सरकारी वकील अँड.माया क्षीरसागर व  सिंगदर गुमानेकर यांनी काम पाहिले असुन कोर्ट  अंमलदार पो.ना. प्रकाश वाघमारे, .जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक   पोलीस निरीक्षक ताटे यांनी काम पाहिले असुन सदर केसचा तपास  तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत,  पोलीस निरीक्षक, 
महेश ढवाण,  व पो. हवा. विलास आंबेकर, पो.शि. विजय शिंदे, उमेश कुतवळ, माऊली शिंदे यांनी केला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!