नौदलाच्या बॅजवरील शिवकालीन राजमुद्रेचे अनावरण...
राजमुद्रेच्या प्रतिबिंबात दिसेल भारताचा समृद्ध वारसा...
गोल्डन नेव्ही बटण
स्वोर्ड
ऑकट्याग
टेलिस्कोप
प्रतिनिधी वैभव पवार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहाशिक अरमाराच्या वारशापासून स्फूर्ती घेऊन भारतीय नौदल विभागाने अधिकऱ्यांसाठी बॅजचे डिझाईन बनवले आहे. यामध्ये शिवकालीन राजमुद्रेचे प्रतिबिंब पाहण्यास मिळणार आहे. नौदल विभागाने या राजमुद्रेचे शुक्रवारी अनावरण केले. या बॅज मधून भारताचा समृद्ध वारसा प्रतिबिंबित होतो.
नौदल दिनानिमित्त झालेल्या सोहळ्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या आरामाराची प्रसंशा केली. महाराजांच्या काळात वापरल्या जात असलेल्या राजमुद्रेच्या चिन्हाचा नौदल अधिकाऱ्यांच्या बॅजवर वापर करण्याची घोषणा त्यांनी केली होती.सिंधुदुर्गातील राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना महाराजांच्या आरमाराच्या धर्तीवरच नौदलातील अधिकाऱ्यांच्या रँक ठेवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. नौदलाच्या नव्या बॅजचे शुक्रवारी अनावरण करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या हुद्यानुसार बॅजवर रँक दिसणार आहे. नौदलाच्या समृद्ध वारशाचे प्रतिबिंब बॅज मधून दिसून येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारापासून स्फूर्ती घेऊन हा बॅज तयार करण्यात आल्याची माहिती नौदलातील सूत्रांनी दिली.