लोणी काळभोर प्रतिनिधी
पुण्यातील लोणी काळभोर येथे इंडियन ऑईल,एचपिसीएल हिट अँड रन या केंद्र सरकारने नवीन कायद्याला प्रतिसाद देण्यासाठी संप पुकारला होता.परंतु लोणी काळभोर चे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण व पोलीसांचा वतीने कायद्याची योग्य माहिती दिल्याने संप मागे घेण्यात आला. एचपीसीएल कर्मचार्यांनी संप मागे घेतला असून तेथून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहर व परिसरातील सर्व पेट्रोल पंप खुले राहणार असल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशने प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले.
केंद्र सरकारने नवा कायदा केला असून त्यात वाहनचालकांकडून अपघात झाला तर त्या अपघाताबद्दल चालकाला १० वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशी तरतुद केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याविरोधात पेट्रोल पुरवठा करणार्या इंडियन ऑइल, एचपीसी एल, बीबीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांनी संप पुकारला होता. या संपाला प्रतिसाद देण्यासाठी लोणी काळभोर येथील एचपीसीएलच्या टँकर चालकांनी संप पुकारला होता. त्यामुळे सकाळी लोणी येथून कोणताही टँकर बाहेर पडला नव्हता. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी संबंधित टँकरचालकांशी भेट घेऊन त्यांना नेमका काय कायदा येणार आहे, याची माहिती दिली. त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर सायंकाळपासून लोणी येथील केंद्रातून पेट्रोल व डिझेलचे टँकर भरुन पाठविण्यास सुरुवात झाली आहे.