आळंदी प्रतिनिधी
वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट मंदिरात पंढरपूर आळंदी पंढरपूर पायी वारी अंतर्गत आळंदी कार्तिकी यात्रा सोहळा उरकून परतीचे प्रवासात जाताना श्री पांडुरंगरायांचे पादुका पालखीचे मुक्कामी आगमना निमित्त स्वागत व पाहुणचार हरिनाम गजरात प्रथा परंपरांचे पालन करीत झाले.
यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांनी श्रींचे पादुकांचे दर्शन घेत श्रीनां हार, श्रीफळ अर्पण करून स्वागत केले. यावेळी पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त माऊली जळगावकर देशमुख, पालखी सोहळा प्रमुख अधिपती विठ्ठलराव वास्कर महाराज, पुजारी संदीप कुलकर्णी, आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील, विश्वस्त भावार्थ देखणे, योगी निरंजंननाथजी, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, , पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष केतन कोठावळे, विलास तात्या शिंदे, माऊली गुळुंजकर आदी मान्यवरांचा सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.
यावेळी ट्रस्टचे खजिनदार दत्तात्रय गायकवाड, काशिनाथ तापकीर, मनोहर भोसले,संचालक प्रवीण काळजे, काळुराम पठारे, रमेश घोंगडे, राजेंद्र नाणेकर, कल्याण आबा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरे समिती यांचे नियंत्रणात श्री पांडुरंगराय पालखी सोहळ्याने परतीचा प्रवास सुरू केला असून परतीचे प्रवासात जाताना सोहळा विसावला होता. यावेळी मंदिर परिसरात आकर्षक रंगावली,
पुष्प सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत स्वागत व पाहुणचार हरिनाम गजरात झाला.श्रींचा महानैवेद्य, भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सोहळा पंढरपूर कडे मार्गस्थ झाला. श्रींचे पालखीचे थोरल्या पादुका मंदिरा समोर आगमन व स्वागत मोठ्या उत्साहात झाले. यावेळी दिंडीतील वारकरी यांनी श्रींची आरती घेऊन श्रींचा पालखी सोहळा हरिनाम गजरात मार्गस्त केला. यावेळी श्रींचे दर्शन घेण्यास भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी दिघी आळंदीचे वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी सुरळीत वाहतुकीचे नियोजन केले.