तालुका विज्ञान प्रदर्शनात सणसवाडी विद्यालयाचा प्रथम क्रमांक

Bharari News
0
सणसवाडी प्रतिनिधी
           शिरूर तालुका विज्ञान प्रदर्शनात सणसवाडी विद्यालयाचा प्रथम क्रमांक / सणसवाडीच्या मुलींनी बनविला स्मार्ट बेंचविज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, राज्य विज्ञान संस्था रवीनगर नागपूर, पुणे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती शिरूर व पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 व 20 डिसेंबर रोजी पार पडलेल्या शिरूर तालुका विज्ञान गणित प्रदर्शनात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी (ता. शिरूर) या विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला.
         विद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्गातील ज्ञानेश्वरी सागर हरगुडे व दिव्या राजेंद्र पवळ या विद्यार्थिनींनी बनविलेल्या स्मार्ट बेंच या उपकरणाला माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळाला. तसेच विद्यालयातील विद्यार्थी सार्थक प्रकाश वांढेकर, भाग्यश्री योगेश काळे व अनुश्री शिवदास दरेकर यांचा प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक मिळाला असून वकृत्व स्पर्धेमध्ये विद्यालयातील अकरावीची विद्यार्थिनी पायल रामदास दरेकर हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे. शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रेखाताई बांदल, विस्तार अधिकारी बाळासाहेब कळमकर, किसन खोडदे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव मारुती कदम, जेष्ठ नेते निवृत्ती आण्णा गवारे, राहुल गवारे आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
              वर्गात दररोजच्या भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी  ज्ञानेश्वरी व दिव्या यांनी बनविलेल्या स्मार्ट बेंच मध्ये वर्गात स्वच्छता राखण्यासाठी बेंच मध्येच कचरा ठेवण्याची रचना आहे. दप्तर ठेवण्यासाठी लॉकर सुविधा आणि हे लोकर त्याच विद्यार्थ्यांच्या अंगठ्याने उघडणार असून दप्तर बरेचसे शाळेतच असल्याने दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांचे कमी होणार असून पाठीच्या व मणक्याच्या समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. या बेंच मध्ये विद्यार्थ्यांना कच्चे काम करण्यासाठी स्मार्ट बोर्ड दिल्यामुळे वह्यांच्या पानांची बचत होणार आहे.
       विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सतत वैज्ञानिक विचार व त्यांच्या  दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी विज्ञानाचा उपयोग कसा करावा यासाठी विद्यालयात प्रत्येक वर्षी विविध उपक्रम राबविले जातात त्याचीच फलश्रुती म्हणजे तालुका विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मिळवलेली यश आहे असे विद्यालयातील विज्ञान शिक्षक संभाजी ठुबे यांनी सांगितले.   
         तालुका पातळीवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा विज्ञान प्रदर्शनात सहभागी होता येणार असल्याने निश्चितच विद्यालयाच्या दृष्टीने आणि संस्थेच्या दृष्टीने ही गौरवास्पद बाब असून हे विद्यार्थी जिल्हा पातळीवर सुद्धा निश्चितच यशस्वी होतील असा विश्वास विद्यालयाच्या प्राचार्या राधिका मेंगवडे यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक संभाजी ठुबे, अजित पंचरास, शैला दरेकर, माधुरी दरेकर आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
       यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे श्री नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंदराव हरगुडे, सचिव बाबासाहेब साठे व सर्व संचालक, सणसवाडीच्या सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, उपसरपंच दत्ताभाऊ हरगुडे व सर्व सदस्य, पंचायत समितीच्या माजी सभापती मोनिकाताई हरगुडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा नूतन हरगुडे, सारिका हरगुडे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा वैशाली दरेकर व सर्व सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या राधिका मेंगवडे, पर्यवेक्षक गौतम देवकर व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!