सुनील भंडारे पाटील
तळेगाव ढमढेरे (तालुका शिरूर) गावामध्ये मोठे हायमॅक्स तसेच पथदिवे दिवसा ढवळ्या गावाला प्रकाश देताना दिसत आहे, प्रवासी तसेच ग्रामस्थ यांच्या दृष्टिकोनातून ही एक हास्याची बाब झाली आहे, एकंदरीत विद्युत ऊर्जा, तसेच ग्रामपंचायतची आर्थिक हानी होताना येथे दिसत आहे,
शिरूर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महावितरण खात्याच्या वतीने शेतीसाठी त्याचप्रमाणे रहदारीसाठी भार नियमनाचे संकट आहे, विद्युत पुरवठ्या अभावी बिबट्या ची तसेच साप,विंचू,काट्याची परवा न करता शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतमालाला रात्री अपरात्री पाणी द्यावे लागते, तर एकीकडे अशाप्रकारे विद्युत पुरवठ्याचा गैरवापर केला जात आहे, तळेगाव ढमढेरे गावामध्ये तसेच बाजार मैदानात मोठे हायमॅक्स दिवे दिवसा ढवळ्या चालू राहिल्याने त्यासाठी लागणारा विद्युत पुरवठा मीटर प्रमाणे इंधनभार, वापरलेल्या रीडिंग प्रमाणे विनाकारण आर्थिक बोजा ग्रामपंचायतीवर पडत आहे, एकंदरीत जनतेच्या पैशाचा तसेच विद्युत पुरवठ्याचा या ठिकाणी गैरवापर होत असल्याचे चित्र उघड होत आहे, दिवसा ढवळ्या चाललेल्या या आना गोंदी कारभार लोकांच्या उघड्या डोळ्यांना दिसत आहे, आता महावितरण कंपनी यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे,
तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत ग्रामसेवक बी बी गोरे यांनी सांगितले की, विद्युत कनेक्शन डायरेक्ट झाले आहे, ते बंद करता येत नसल्याने दिवसा पण गावामधील लाईट चालू आहे, दिवसा लाईट कशी बंद करता येईल याचे नियोजन लवकर करू,