प्रतिनिधी वैभव पवार
विशेष सरकारी वकील अँड उज्ज्वल निकम यांना लोकसेवेतल्या उत्कृष्ट कार्याबद्दल 'सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार 2023,नं सूर्यदत्त एज्युकेशन फौंडेशन, पुणे चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सूर्यदत्त विधी कॉलजचे,प्राचार्य डॉ. मिथिलेश वर्मा, प्रा. केतकी बापट आणि प्रा. मोनिका सेहरावत उपस्थित होत्या.
निकम यांनी जळगाव येथील शाळा, महाविद्यालय, वकिलीचा अभ्यास, विविध दाव्यामध्ये आलेले अनुभव आणि या सर्वातून झालेली ज्ञानप्राप्ती हा जीवनप्रावास विद्यार्थी वर्गासमोर उलगडला. ते म्हणाले 'माझी वकील इच्छा नव्हती ;त्यामुळे विशेष सरकारी वकील होईन आणि उत्कृष्ट कामगिरी करीन असे काही ध्येय समोर नव्हते. मात्र समोर आलेल्या संधीचं सोनं केलं, असं मी नक्की म्हणू शकीन! सामाण्य माणूस तर्क संगत बोलू लागल्यास,आपण त्याला म्हणतो कि वकीला सारखा बोलू लागलास. याचा अर्थ वकिलीसाठी तर्कसंगत बोलणं आवश्यक आहे.' विशेष सन्माना बद्दल निकम यांनी 'सूर्यदत्त 'चे आभार मानले ;तसेच प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना कायदा क्षेत्रातल्या प्रवासासाठी शुभेच्छा ही दिल्या.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस चे संस्थापक -अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले देशाच्या कायदे विषयक इतिहासात उज्ज्वल निकम यांचं नांव सुवर्ण अक्षरांत लिहिलं जाईल. विशेष सरकारी वकील आणि उत्तम माणूस म्हणून त्यांची नोंद घेण्यात येईल. अत्यंत कठीण खटले लढण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांनी प्रामुख्याने खून आणि दहशदवादाच्या प्रकारणावर काम केलं आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यास मदत केली. त्यांच्या या कामगिरी बद्दल त्यांना सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला आहे. यावेळी सूर्यदत्त विधी कॉलेज चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या वेळी मोठया संख्येने उपस्थित होते.