धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी दिलेले बलिदान, जीवनपट तसेच चाळीस दिवस औरंग्याने त्यांचे केलेले हाल या बलिदान मासातील शंभूराजांचा धगधगता इतिहास चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक राकेश दुलगुज यांनी समाजासमोर मांडला आहे, छत्रपती संभाजी हा चित्रपट 26 जानेवारी 2024 पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे, हा चित्रपट आज वढू बुद्रुक तुळापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी रिलीज करण्यात आला,
गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची शूटिंग चालू होती, आणि अखेर हा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मोठा सुवर्णक्षण जवळ आला आहे, सद्यस्थितीत मराठी आणि हिंदी या दोन भाषेमधून चित्रपट प्रदर्शित होणार असून थोड्या दिवसात इतर भाषेमध्ये देखील चित्रपट प्रदर्शित होणार आहे, आज मंगळवार तारीख 9 रोजी सकाळी 10:30 वाजता चित्रपटाची सर्व टीम वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी उपस्थित राहून समाधीचे पूजन करून छत्रपती संभाजी हा चित्रपट रिलीज करण्यात आला, आपल्या राज्यातून, भारत देशातून तसेच संपूर्ण जगातून या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळणार आहे,
याप्रसंगी निर्माता व निर्देशक - राकेश सुबेसिंह दुलगज, ,स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज ,मिलिंद भाऊ एकबोटे,अभिनेता- प्रमोद पवार, प्रवीण गायकवाड़,भजनसम्राट अनूप जलोटा टीम,दिलीप बाविस्कर,रंजीत काले,शेष महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती अध्यक्ष सोमनाथ भंडारे, खजिनदार लक्ष्मण भंडारे, सचिन भंडारे, विनोद भंडारे, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,