प्रतिनिधी शिक्रापूर
मी वाघाची वाघीण मरण जरी आले तरी शरण जाणार नाही,मी एका हिंदुत्व वाद्याची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे , मी मरण पण शरण जाणार नाही असे उदगार शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मनोगत व्यक्त केले.
सरकार आणि प्रशासनावर आपला संपूर्ण विश्वास आहे, कायदा नक्कीच आपल्याला न्याय देईल अशा त्या बोलताना म्हणाल्या ,जर समोरच्यांना असे वाटत असेल की या प्रकाराने ही वाघीण घाबरून जाईल पण हा त्यांचा गोड गैरसमज आहे तो त्यांनी प्रथमता दूर करावा. शरद मोहळ ची पत्नी स्वाती मोहोळ या पुणे शहर महिला आघाडी सरचिटणीस आहेत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी एप्रिल 2023 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता पण या प्रवेशा नंतर विरोधकांनी भाजपावर सडकून टीका केली होती. भाजपा पक्ष हा येत्या काळात गुंडांचा पक्ष होतो की काय अशी सुद्धा सडकून टीका विरोधकांनी केली होती. आलेल्या संकटाला वाघिणीसारखे तोंड देणार असे यावेळी स्वाती मोहोळ यांनी भरारी न्युजशी बोलताना सांगितले,