लोणी काळभोर प्रतिनिधी
लोणी काळभोर (ता हवेली) शिकवणीसाठी जात असणाऱ्या एका नववीतील अल्पवयीन विद्यार्थिनीला अज्ञात आमिष दाखून पळून नेत असणाऱ्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. युवराज सोमनाथ सोनवणे (वय-२२, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही लोणी काळभोर येथील एका नामांकित शाळेमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तसेच तिने लोणी काळभोर येथील एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणी लावली आहे. अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे ३० डिसेंबर २०२३ रोजी क्लासला गेली होती. तेव्हा आरोपी सोनवणे याने अल्पवयीन मुलीला अज्ञात कारणाचे आमिष दाखवून फुस लावली आणि तिला पळून घेऊन गेला होता.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता. आरोपी सोनवणे याच्या विरोधात भा. द वि. कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी सोनवणे याला अटक केली. तर अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तरटे करीत आहेत,