कोरेगाव भिमा मधून गुटखा साठा जप्त, अन्न सुरक्षा प्रशासन विभागाने केली मोठी कारवाई

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
              कोरेगाव भिमा (ता. शिरुर)  वढु बु रोड येथे अन्न सुरक्षा प्रशासन विभागाने कारवाई केली असून कारवाईत नव्वद हजार एकशे अठ्ठावीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी तिलोकाराम गीरीधारीराम चौधरी यांस अटक करून शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              सदरील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या मिळालेल्या माहितीनुसार अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत कोरेगाव भीमा स्टार एजन्सी येथे पान मसाला गुटखा मालाचा साठा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी त्यांना  
1) 8316/- रु कींमतीचे 42 विमल पानमसाला पॅकेट प्रती पँकेट)
 2) 880/-रु कींमतीचे 40 वि-1 सुगंधित तंबाखु (रु 22 पँकेट)
3) 23760/- रु किंमतीचे 198 विमल पानमसाला पॅकेट) 120 प्रति
4) 5850/- रु किंमतीचे 195 वि-1 सुगंधित तंबाख रु.30-प्र पॅकेट)
5) 7854/- रु किंमतीचे 42 विमल पानमसाला (रू. 187 प्रति पँकेट)
6) 1320/- रु किंमतीचे 40 वि-1 सुगंधित तंबाखु (रु.33 प्रति पॅकेट)
7) 19404/- रु किंमतीचे 98 राजनिवास सुगंधित पानमसाला (रु.198 प्रति पॅकेट)
8) 2090/- रु किंमतीचे 95 जेड एल-01 जाफारानी जर्दा (रु. 22 प्रति पँकेट)
9) 9636/- रु किंमतीचे 73 राजनिवास सुगंधित पानमसाला (रु. 132 प्रति पँकेट)
10) 2310/- रु किंमतीचे 70 जेड एल-01 जाफाराणी जर्दा (रु 33 प्रति पँकेट)
11) 8100/- रु किंमतीचे 30 राजश्री पानमसाला (रु 270 प्रति पँकेट)
12) 607.5/- रु किंमतीचे 27 ब्लँक लेबल प्रिमीयम च्युविंग
तंबाकु (रु 22.50 प्रति पँकेट)
असा एकुण 90128/- रु. किमतीचा मुद्देमाल आढळून आला त्यानुसार त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात, पुणे  ग्रामीण गु.र.नं. 1283/2023 भा.द.वि.क. अंतर्गत 328, 272, 273, 188 नुसार आरोपी तिलोकाराम गीरीधारीराम चौधरी वय ३७ वर्ष, रा. योगायोग बिल्डींग, ३ रा. मजला, वढु रोड, कोरेगाव भिमा ता. शिरुर जि.पुणे मुळ रा. पत्री बसवेश्वर मंदीर, KVOR कॉलनी, बेलरी, याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे मार्गदर्शन खाली शिक्रापूर पोलीस करत आहेत,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!