लोणी काळभोर प्रतिनिधी
आज पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी सोमवारी आल्याने भाविकांनी थेऊर येथील श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजार महेश आगलावे यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली यावेळी विश्वस्त केशव उमेश विद्वांस उपस्थित होते. देवस्थान व आगलावे बंधूंतर्फे मंदिर प्रांगणात मांडव घालण्यात आले होते, दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि अक्षय ब्लड सेंटर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्याला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. पुणे शहर उपायुक्त रुख्मिणी गलांडे मॅडम यांनी मंदिराला भेट दिली.
सायकलने अष्टविनायक दर्शन करणार्या भाविकांनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवला होता. गलांडे मॅडम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली. दिवसभर भाविकांची गर्दी कमी जास्त होत होती. सायंकाळी पाच वाजले नंतर दर्शनाला येणार्या भक्तांची गर्दी वाढली. सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळी यांची साथीने ह.भ.प. निर्मलनाथ महाराज ( आळंदी देवाची ) यांचे सुभाष्य कीर्तन झाले, चिंतामणी प्रासादिक भजनी मंडळी यांची साथ लाभली. चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना निघला त्यांनतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद देण्यात आला. जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने देवस्थान तर्फे जादा सुरक्षा व्यवस्था करण्यात केली होती. ग्रामपंचायती तर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थानचे विश्वस्त केशव उमेश विद्वांस लक्ष सर्व कार्यक्रमावर नियंत्रण ठेवत होते,