सुनील भंडारे पाटील
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ तसेच काव्य संमेलन या कार्यक्रमाचे आयोजन त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल नेवासा या ठिकाणी शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कार. करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना त्या ठिकाणी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.
त्यामध्ये आपल्या शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी चे विद्यमान सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांचे कार्य पाहून तसेच समाजा प्रतीचे आदर पाहून त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच म्हणून नगर जिल्ह्यातील नेवासा या ठिकाणी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाच्या प्रमुख सुनीताताई घाडगे पाटील,तसेच ह भ प संगीताताई गुंजाळ,शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण संजयजी वाघमारे,संस्थेचे सचिव ताईसाहेब वाघमारे,संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब शिरसाठ,राज्य समन्वयक धीरज भाऊ कांबळे, महाराष्ट्र मार्गदर्शक सुधीर भाऊ चव्हाण,दिपालीताई सरोवसे,सुषमाताई आणि मेजर तुकाराम डफळ यांच्या उपस्थिती मध्ये सदर मान्यवरांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात आला.
त्यावेळी बापूसाहेब काळे यांनी सांगितले कि जनतेने जो माझ्यावर विश्वास टाकला टाकला आहे तो सार्थकी करण्यासाठी झटत असून जनतेची प्रामाणिक पणे सेवा करण हे माझं कर्तव्य समजतो आणि म्हणून मी माझ्या अंतःकरनापासून मला जनतेची सेवा करावीसी वाटते. कारण जनतेच्या सेवेला मी भुकेलेला असून मला राजकारणा पेक्षा समाज कारण जास्त महत्वाचे वाटते. जनतेची प्रगती हि समाजकारनातून होत असते. यावेळी प्रगतशील शेतकरी नामदेव काळे,संतोष काळे,कृष्णा काबले उपस्थित होते.