आळंदी प्रतिनिधी
जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने क्रोयेशिया ( युरोप ) येथे होणाऱ्या जागतिक मानांकन कुस्ती स्पर्धेसाठी प्रा .दिनेश गुंड यांची भारतीय कुस्ती संघटनेच्या समिती कडून पंच म्हणून निवड करण्यात आली आहे . पॅरिस ऑलम्पिकच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी ही स्पर्धा दि .9 ते 14 जानेवारी या कालावधीत क्रोयेशिया जाग्राब येथे होणार आहे.
प्रा. दिनेश गुंड हे जागतिक कुस्ती संघटनेचे प्रथम श्रेणीचे पंच असून ही त्यांची 57 वी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आहे .आज पर्यंत त्यांनी अनेक आशियाई ,जागतिक ,विश्वचषक ,तसेच ऑलम्पिक पात्रता स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले आहे.100 हून अधिक राष्ट्रीय स्पर्धा आणि 57 अंतरराष्ट्रीय स्पर्धा अशी कामगिरी करणारे महाराष्ट्रातील ते एकमेव तांत्रिक अधिकारी आहेत.