दैनंदिन जीवनामध्ये कमी पडणारा पैसा ही गरज भागवण्यासाठी नागरिकांना व्यवसाय कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज, पर्सनल लोन,शेती कर्ज अशा वेगवेगळ्या कर्जाचा आधार लोकांना घ्यावा लागतो, परंतु अशा सर्वच लोकांना राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज मिळत नाही, त्यांना कर्ज न देण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर खराब आहे, त्यामुळे तुम्हाला कर्ज दिले जाणार नाही, असे शंभर टक्के उत्तर दिले जाते,
नोटबंदी त्याचप्रमाणे कोरोना महामारीचा दीर्घ कालावधी यामुळे समाजामध्ये काही बोटावर मोजणे एवढी श्रीमंत लोक सोडता समाजामधील सुमारे 80% (अंदाजे) लोकांवर आर्थिक संकट कोसळले आहे, कर्जाच्या हप्ते भरणारे लोक तर कसेबसे खडतर जीवन जगत आहेत, लहान मोठे व्यवसाय पूर्ण गाळात गेले आहेत, पूर्वीचे कर्ज फेडता फेडता लोकांची दमछाक झाली आहे, वर सांगितलेल्या कारणाने हप्ते वेळेत न गेल्याने बहुतांश लोकांचा सिबिल स्कोर खूप खराब झाला आहे, त्यामुळे अशा लोकांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत, राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज मिळून न देणे, त्यांना सिबिल स्कोरचे कारण सांगणे व कर्ज घेणाऱ्या लोकांचा प्रवाह सहकारी बँका तसेच पतसंस्थांकडे वळवण्याचे हे मोठे षडयंत्र समाजामध्ये घडत आहे, अशी चर्चा सध्या समाजामध्ये तसेच नागरिकांमध्ये रंगू लागली आहे,
राष्ट्रीयकृत बँकांमधून सर्वसामान्य नागरिकांना कर्ज मिळून देण्यासाठी आता केंद्र शासन तसेच राज्य शासनाने विचार करायला हवा मध्यंतरी आलेल्या मोठ्या संकटामुळे लोकांचा ईलाज नसताना सिबिल स्कोर खराब झाल्याने कर्ज मिळत नसल्याने अनेक अडीअडचणी तयार होत आहेत, त्यामुळे यावर पर्याय काढून लोकांना दिलासा मिळावा अशी मागणी, नागरिकांमधून वारंवार होत आहे,