लोणी काळभोर प्रतिनिधी
हवेली तालुक्यातील लोणी काळभोर हद्दीतील रामदरा रोडवर असलेल्या रेल्वेच्या पुलावर अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह आधळून आला. ही घटना सर्वत्र पसल्याने लोणी काळभोरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून. मात्र, अनोळखी मृतदेहाची अद्याप ओळख पटवून त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे प्रयत्न लोणी काळभोर पोलिस करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य पांडुरंग केसकर हे सायंकाळच्या सुमारास रामदरा रस्त्यावरून चालले होते. त्यांना रेल्वेपुलावर आडोशाला एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्यानंतर केसकर यांनी ताबडतोब याची माहिती बाळासाहेब जयवंत काळभोर यांना दिली. त्यानंतर बाळासाहेब काळभोर यांनी हि माहिती तत्काळ संपर्क साधून पत्रकार राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर यांना दिली. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन बापूसाहेब काळभोर यांना तात्काळ लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधला. व या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली.
मयताच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा शर्ट आहे. त्याचे वय अंदाजे ३५ असावे. त्याचा रंग काळा सावळा आहे. तर चेहऱ्यावर दाढी-मिशा वाढलेली आहे. अशा वर्णनाचा
व्यक्ती आपल्या परिचयाचा असल्यास लोणी काळभोर पोलिसांशी त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन लोणी काळभोर पोलिसांनी केलं. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह तात्काळ ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठविला आहे. या अनोळखी मृतदेहाच्या अंगावर कोणतीही इजा नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. मात्र, सध्या अनोळखी मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे मृताच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे लोणी काळभोर पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.