सुनील भंडारे पाटील
ग्रामपंचायत हद्दीतील व परिसरातील गौणखनिज उत्खनन खनिकर्म क्षेत्रात होत असलेल्या बेकायदेशीर खाणी, स्टोन क्रशर प्लांट, बेकायदेशीर वाळू प्लांट, बेकायदेशीर खडी मशीन प्लांट, व बेकायदेशीर गौण खनिजाची वाहतूकीमुळे होणाऱ्या प्रदूषण नियंत्रणासाठी व कायदेशीर कार्यवाहीसाठी लोणीकंद ग्रामस्थांनी दि.२४ फेबुवारी २०२४ रोजी लेखी अर्जाद्वारे ३००/ सहयानिशी विशेष ग्रामसभा घेण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे
लोणीकंद परिसरात खडी मशीन व्यवसायामुळे व गौण खनिज .वाहतुकीमुळे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होत असून लोणीकंद ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना विविध प्रकारचे श्वसनाचे आजार व त्वचाविकार उदभवू लागले आहेत वायुप्रदूषणामुळे प्राणघातक फुफ्फुसाचे व हृदयाचे विकार उदभवू लागले आहेत
प्राणवायू ऑक्सिजन हे जीवनावश्यक घटक असून जीवन जगण्यासाठी मुलभूत गरजेचा आहे सदरच्या प्रदूषणामुळे लोणीकंद ग्रामस्थांच्या स्वस्थ जीवन जगण्याच्या मुलभूत
हक्कावर प्राणघातक हल्ला झाला आहे तरी आपणास विनंती आहे की वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घ्यावे .
सदरच्या बेकायदेशीर, अवैध खनिकर्म उद्योग, स्टोन क्रशर प्लांट्स, वाळू प्लांट, खडी मशीन प्लांट, डांबर प्लांट, अवैध गौण खनिज वाहतूक इत्यादींवर कायदेशीर कारवाई करून कायमची उपाययोजना करण्यासाठी लवकरात लवकर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे व आपणास इष्ट व न्यायिक वाटेल अशी कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत कडे लेखी अर्जाद्वारे करण्यात आली आहे .