आदर्श गाव- मिडगुलवाडी येथील आनंद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या वतीने सभासदांना १२% टक्के लाभांश चे वाटप करण्यात आले. बिनविरोध निवडणुकीचे परंपरा जपणारे व शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत निर्णय घेणारे सोसायटी म्हणून नावलौकिक असणारी सलग तीन वर्ष 100% कर्ज वसुली असलेली व नेहमीच वर्ग अ दर्जा असणाऱ्या सोसायटीने शेतकरी सभासदांना बारा टक्के लाभांश चे वाटप केले असल्याचे सोसायटीचे चेअरमन अमोल मिडगुले यांनी दिली.
आनंद सोसायटी ही नावाजलेली सोसायटी असून ही सोसायटी नेहमी शेतकऱ्याची असून नेहमीच सभासदांना फायदेशीर योजना राबवत असल्याचे चेअरमन अमोल मिडगुले यानी सांगीतले.सन-२०२२ मध्ये संस्थेने स्वमालकीचे ऑफिस नूतिणीकरण काम केले असून.सन 2023 मध्ये सभासदांना 9215500 रुपये कर्ज वाटप केला आहे संस्था स्थापनेपासून प्रथमच सभासदांना लाभाश वाटप करण्यात आला.ऐन दुष्काळात शेतकऱ्यांच्या खात्यात १२ टक्के डिव्हिडंटचे रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.याप्रसंगी संस्थेचे विद्यमान चेअरमन अमोल मिडगुले, व्हॉ. चेअरमण दत्तात्रय शिवले, संचालक विष्णू मिडगुले, संजय पिंगळे, कैलास मिडगुले, काळुराम गाजरे, नवनाथ मिडगुले,भगवान मिडगुले, आनंदा मिडगुले, ज्ञानेश्वर मोहिते, बाळासाहेब मिडगुले, दिलीप मिडगुले, रंगुबाई मिडगुले, सुनीता ताबे,तसेच सचिव-सुखदेव खर्डे.मदतनीस -मोहन तळोले,सरपंच सुनीलनाना मिडगुले,उपसरपंच सतीश ईचके,उपसरपंच अविनाश मिडगुले,उपसरपंच शरद पोपळे
तटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर गाजरे,तटामुक्ती उप्अध्यक्ष भक्तीराम गाजरे,संदीप कोळेकर मा.सरपंच गणेश मिडगुले प्रकाश गाजरे आदी मान्यवर उपस्थित होते.