सुनील भंडारे पाटील
लोणीकंद (ता हवेली) गावात मोठ्या प्रमाणात खाण व स्टोन क्रेशर आहेत क्रेशर चालक शासनाने दिलेले धूळ प्रतिबंधक उपाय तसेच नियम व अटींचे कसल्याही प्रकारचे पालन करीत नसल्याने लोणीकंद ग्रामस्थांनी बुधवार दि. २१ रोजी रस्ता खोदून वाहतूक बंद केली त्यासाठी लोणीकंद ग्रामपंचायतीने विशेष सभा घेतली त्यामध्ये धूळ प्रतिबंधक उपाय योजना होत नाही तोपर्यंत क्रेशर बंद ठेवण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला.
त्यावेळी पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद, पुणे जिल्हा परिषदचे माजी सदस्य शंकर भूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रविंद्र कंद, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप कंद, यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रा. सदस्य ग्रामविकास अधिकारी तसेच गावातील बहुसंख्य ग्रामस्थ व क्रेशर चालक ग्रामसभेस उपस्थित होते .
लोणीकंद हद्दीतील सदरील क्रशर / डांबर प्लांट सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालविण्यात यावा त्या संबंधी सूचना केल्या होत्या सूचनेप्रमाणे कार्यवाही होत नाही. तसेच खाण / डांबर प्लांट व्यवसायासाठी असणारे सर्व कामे वरील वेळेत करावी, रात्रीचे वेळी सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व क्रशर / डांबर प्लांट बंद
ठेवणेत यावेत,धूळ प्रतिबंधक उपाय योजना बंधनकारक सर्व गाड्या झाकून नेणे. योग्य ती खबरदारी घेणेत यावी, पुरेशे व योग्य प्रमाणात पाण्याचा वापर होत नसल्याचे दिसून येते. सर्व क्रशरवर /डांबर प्लांट या ठिकाणी पाणी मारण्यात यावे, अंतर्गत रस्त्यावर पाणी मारण्यात यावे. नगररोड ते क्रशर / डांबर प्लांट पर्यंतच्या सर्व रस्त्यावर पाणी मारणेत यावे, वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सायलेंसरची पोझिशन नियमाप्रमाणे ठेवणे, वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे पुरेशी वृक्ष लागवड केलेली नाही, त्याबाबतचे सर्व नियमांचे पालन करणे आपलेवर बंधनकारक आहे. परंतु
ग्रामपंचायतीने वारंवार सूचना देऊनही क्रेशर चालक जाणून बुजून हलगर्जीपणा करून नियम अटींचे उल्लंघन करीत आहेत क्रेशर चालकांनी धूळ प्रतिबंधक उपाय योजना त्वरीत करून घेणे ती पूर्ण झाल्यास ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ येऊन धूळ प्रतिबंधक काम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर क्रेशर सुरु करावे असे यावेळी प्रदीपदादा कंद यांनी जाहीरपणे सांगितले.